आज दि.१७ आॕगस्ट च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

तालिबानचा कब्जा,
भारतासह इतर देशांसाठी डोकेदुखी

अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा केल्यानंतर भारताच्या कुटनीतिक गोटात गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. तालिबानचे शासन दहशतवादविरोधी लढ्यात भारतासह इतर देशांसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. तसेच भारतीय व्यापार आणि गुंतवणूकीवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. चीन आणि पाकिस्तानशी तालिबानशी असलेल्या राजकीय संबंधांमुळेसुद्धा भारतासमोर मोठे आव्हान ठरण्याची शक्यता आहे.

तालिबानसंदर्भातील भूमिकेबद्दल
आता चीनला शंका

तालिबानने सर्वसमावेशक इस्लामिक सरकार स्थापन करण्याचे आणि अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित करण्याचे आश्वासन दिल्यानंतर काही तासांनी चीनने एक इशारा जारी केलाय. या इशाऱ्यामधून आधी मैत्रीचा हात पुढे करणाऱ्या चीनच्या तालिबानसंदर्भातील भूमिकेबद्दल आता चीनलाच शंका वाटू लागलीय की काय असे प्रश्न उपस्थित केले जाताय. सोमवारी चीनने तालिबानशी ‘मैत्रीपूर्ण संबंध’ प्रस्थापित करण्यास तयार असल्याचे म्हटले होते. भारताच्या अध्यक्षतेखाली अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या आपत्कालीन बैठकीत चीनने भूमिकेवरुन यू-टर्न घेतल्याचं पहायला मिळालं आहे.

१३४ क्षमता असलेल्या विमानात
तब्बल ८०० लोकांनी केला प्रवेश

अफगाणिस्तानमधून बाहेर पडण्यासाठी अमेरिकेच्या १३४ क्षमता असलेल्या विमानात तब्बल ८०० लोकांनी प्रवेश केल्याचा फोटो सोशल मीडियामध्ये चांगलाच व्हायरल झाला आहे. विमानात प्रवेश केलेल्यांपैकी ६४० लोक हे अफगाणी नागरिक आहेत. अमेरिकेच्या वायूदलाचे हे विमान अमेरिकन नागरिकांची सुटका करण्यासाठी काबुलला गेल्यानंतर या विमानात बसण्यासाठी अशी गर्दी झाली. अफगाणिस्तानमध्ये राहिलो तर आपल्याला ठार मारले जाईल ही भीती या नागरिकांमध्ये असल्यामुळे ही गर्दी झाली..

नीरज चोप्राची
प्रकृती पुन्हा बिघडली

टोक्यो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राची प्रकृती पुन्हा बिघडली आहे. नीरज पदक जिंकल्यानंतर दहा दिवसांनी मंगळवारी पानिपतला पोहोचला. त्याचा ताफा समालखाच्या हलदना सीमेवरून खंडरा गावात पोहोचला. खंडरा येथील कार्यक्रमातूनच नीरजला रुग्णालयात नेण्यात आले.

सरकारला ओबीसींना आरक्षण
द्यायचे नाही : फडणवीस

ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भात सुद्धा राज्य सरकार चालढकल करते आहे. जोवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नाहीत, तोवर या सरकारला कारणे सांगायचे आहेत. या सरकारला ओबीसींना आरक्षण द्यायचे नाही असे सांगत माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. पुणे येथे माध्यमांशी ते बोलत होते. यावेळी त्यांनी बैलगाडी शर्यतीच्या प्रश्नावर सांगितले की, आमच्या सरकारच्या काळात बैलगाडी शर्यतीसंदर्भात कायदा केला होता. दुर्दैवाने त्याला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली. पण ती मागे घेण्यासाठी या सरकारने कोणतीही पाऊले उचलली नाहीत.

टी२० विश्वचषकाचे
वेळापत्रक जाहीर

क्रिकेटरसिकांची मोठी उत्कंठा शमली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने टी२० विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या काळात विश्वचषक आखाती देशात होणार आहे. यात भारताचा सामना पाकिस्तानसोबत २४ ऑक्टोबरला होणार आहे.

सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत
शाळा सुरु व्हायला नको

राज्यात कोरोनाचं (Corona) प्रमाण काही अंशी घटताना दिसत असल्याचं चित्र पाहत राज्य शासनाच्या शिक्षण विभागानं 17 ऑगस्टपासून निर्बंध शिथिल असणाऱ्या भागांमध्ये सर्व कोरोना प्रतिबंधात्मक निर्बंधांचं पालन करत शाळा सुरु होणार असल्याची महत्त्वाची घोषणा केली होती. पण, सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत शाळा सुरु व्हायला नकोत, अशा इशारावजा सूचना टास्क फोर्सनं राज्य सरकारला केल्या आहेत.

राज्यात डेल्टा प्लसचा धोका,
आणखी 10 नवे रुग्ण वाढले

राज्य बऱ्यापैकी अनलॉक झालेले असलं तरी सुदैवाने अजूनही राज्यातली कोरोना रुग्णवाढ आटोक्यात आहे. कारण काल दिवसभरात राज्यात 4 हजार 145 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 5 हजार 811 रुग्ण बरे होऊन घरी परतलेत. दुसरीकडे 24 तासांत 100 रुग्णांचा मृत्यू झाला. या घडीला राज्यात 62 हजार 452 एक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. मात्र, असे असताना चिंता वाढवणारी बातमी हाती आली आहे. राज्यात डेल्टा प्लसचा (Delta Plus) वाढता धोका दिसून येत आहे. आणखी 10 नवे रुग्ण वाढले आहेत.

राज्यात पावसासाठी
अनुकूल वातावरण

हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज खरा ठरला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळला. रात्रभर मुसळधार पावसाने औरंगाबाद जिल्ह्याला झोडपले. पैठण, वैजापूर, गंगापूर या तालुक्यात सर्वाधिक पाऊस बरसला. अनेक नदी नाल्यांना पूर आलाय. 15 दिवसांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात पावसाची जोरदार एन्ट्री झाली आहे. दरम्यान, राज्यात पुढील दोन ते तीन दिवसात बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

केंद्र सरकारने केली ओबीसींची
फसवणूक : शरद पवार

केंद्र सरकारने घटना दुरुस्ती केल्याने आता राज्यांना आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा झाला असं अनेकांना वाटलं. खरंतर याबाबत अनेकांचा गैरसमज झाला आहे, असं सांगतानाच जेवणाचं निमंत्रण दिलं पण हात बांधला, असा हा प्रकार असून केंद्राने ओबीसींची शुद्ध फसवणूक केलीय, अशी टीका राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केंद्रावर केली आहे.

SD social media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.