स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर देशातील सुरक्षा वाढवली

स्वातंत्र्याच्या उत्सवात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून सर्व तयारी करण्यात आली आहे. राजधानी दिल्लीपासून काश्मीरपर्यंत सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दिल्लीत सर्वत्र सुरक्षा दलाचे जवान तैनात आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर, अनेक प्रतिष्ठित मार्ग बंद करण्यात आले आहेत आणि दिल्ली सीमेवर कडक नजर ठेवली जात आहे. याशिवाय ड्रोनविरोधी यंत्रणाही (Anti-drone System) तैनात करण्यात आली आहे. दरम्यान, महाराष्ट्रातही मुंबई शहरात आणि महत्वाच्या रेल्वे स्टेशनवर सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.

जम्मू -काश्मीरमध्येही (Jammu & Kashmir) स्वातंत्र्यदिनाबाबत (Independence Day) कडक खबरदारी घेण्यात आली आहे. रस्त्यावर फिरणाऱ्यांचा शोध घेतला जात आहे. वास्तविक, भारताकडून सातत्याने सडेतोड उत्तर मिळाल्ल्यानंतर पाकिस्तान चिडला आहे. अशा परिस्थितीत, तो कोणत्याही षडयंत्राची अंमलबजावणी करण्याची योजना देखील करू शकतो. हे लक्षात घेऊन सुरक्षा दल काश्मीर खोऱ्यात विशेष दक्षता घेत आहेत. संवेदनशील भागात मोठ्या संख्येने सैनिक तैनात करण्यात आले आहेत.

स्वातंत्र्यदिनापूर्वी आणि उत्सवाच्या दिवशी दिल्लीवर दहशतवादी हल्ल्याचा धोका आहे. या संदर्भात गुप्तचर यंत्रणांकडून अलर्टही जारी करण्यात आला आहे. या संदर्भात शुक्रवारी दुपारी दिल्ली पोलिसांच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. अलर्ट गांभीर्याने घेत दिल्ली पोलिसांनी मेट्रो, मार्केट, मॉल इत्यादींची सुरक्षा वाढवली आहे. याशिवाय दिल्लीच्या सीमेवरही विशेष दक्षता घेतली जात आहे. जाणाऱ्या प्रत्येक वाहनाचा शोध घेतला जात आहे.

त्याचवेळी, 15 ऑगस्ट रोजी खलिस्तानी समर्थकही गोंधळ घालतील अशी अपेक्षा आहे. दिल्ली आणि पंजाबमधील ऐतिहासिक इमारतींसह अनेक ठिकाणी खलिस्तानी खलिस्तानी ध्वज फडकवू शकतात, अशी माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली आहे. हे पाहता सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. खलिस्तानी शेतकऱ्यांना भडकवू शकतात आणि उग्र निदर्शने करू शकतात अशी भीती इनपुटमध्ये व्यक्त केली गेली आहे. 14 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 12 ते 15 ऑगस्ट दरम्यान स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमादरम्यान किंवा नंतर खलिस्तान समर्थक गोंधळ निर्माण करू शकतात असे गुप्तचर अलर्टमध्ये म्हटले आहे.

दहशतवादी हल्ल्याच्या इनपुट दरम्यान खलिस्तानी समर्थकांबद्दल मिळालेल्या गुप्तचर अलर्टमुळे दिल्ली पोलिस सतर्क झाले आहेत. पोलिसांनी आपल्या गुप्तचर विभागाच्या विशेष युनिटलाही सतर्क केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, साध्या गणवेशातील पोलिसांना ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांवर तैनात केले जात आहे. याशिवाय 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर फुगे आणि ड्रोन उडवण्यावर बंदी घालण्यात आली आहे आणि संपूर्ण दिल्लीत कलम 144 लागू करण्यात आले आहे.

दरम्यान, जम्मू-काश्मीरपर्यंत अलर्ट जारी करण्यात आला आहे. एवढंच नाही तर गुप्तचर संघटनांना देखील सतर्क राहण्यासाठी सांगण्यात आलं आहे. असं असतानाच मुंबई विमानतळाच्या धावपट्टीच्या दिशेने अज्ञातांकडून पेट्रोलच्या बाटल्या फेकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामुळे सुरक्षा यंत्रणा सावध झाली आहे. बुधवारी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली आहे. यानंतर बॉम्बशोधक व निकामी पथकांच्या टीमने तपासणी करीत संपूर्ण परिसराची झडती घेत बंदोबस्त वाढवला आहे. मुंबईसह अनेक रेल्वे स्थानकांवर सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.

(फोटो क्रेडिट गुगल)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.