बॉलिवूड अभिनेता विकी कौशल याने आज लाखो लोकांच्या मनात घर केले आहे. आज अर्थात 16 मे रोजी विकी कौशलचा वाढदिवस आहे. विक्की कौशलने आपल्या शानदार अभिनयाच्या जोरावर प्रत्येकाच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. विकी आपल्या रफ आणि टफ लूकसाठी चाहत्यांमध्ये विशेषतः तरुणींमध्ये खूप लोकप्रिय आहे. विक्की जरी आज यशाच्या शिखरावर असला तरी इथपर्यंत पोहोचणे त्याच्यासाठी सोपे नव्हते
विक्की मुलींमध्ये खूप प्रसिद्ध आहे. विकीने हळू हळू आपल्या चाहत्यांमध्ये एक खास ओळख निर्माण केली. चित्रपट जगात संघर्ष केल्याशिवाय कोणालाही यश मिळालं नाही, तर विक्कीसाठीही हे यश सोपं नव्हतं.
मुंबईतील एका छोट्या चाळीत 1988मध्ये विक्कीचा जन्म झाला. त्याचे वडील शाम कौशल बॉलिवूड स्टंटमॅन होते. विक्कीच्या वडिलांनी बॉलिवूडमधील बर्याच चित्रपटांमध्ये स्टंटमॅन म्हणून काम केले आहे. विक्कीच्या वडिलांच्या आयुष्यातला एक वेळ अशी आली जेव्हा त्यांनी काम बंद केले. कदाचित म्हणूनच त्याचे वडिल आपल्या मुलाला नोकरी करताना पाहू इच्छित होते.
ज्यावेळी विक्कीच्या वडिलांनी काम बंद केले होते, त्यावेळी तो मुंबईतल्या राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून इंजिनिअरिंग करत होता. स्वत: विकीने याबद्दल सांगितले आहे की, एखादी चांगली नोकरी करावी आणि आपले करियर सेट करावे अशी त्याच्या वडिलांनी इच्छा होती.
विक्कीला नेहमीच अभिनयात रस असायचा. त्याला लहानपणापासूनच अभिनय करायचा होता. बर्याच नोकर्या नाकारल्यानंतर विक्कीने अभिनय शाळेत प्रवेश घेण्याचा विचार केला. विक्की कौशलने किशोर नमित कपूर अॅक्टिंग अकादमीमध्ये अभिनयाचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली आणि ‘गँग्स ऑफ वासेपुर’ चित्रपटाच्या दोन्ही भागात अनुराग कश्यप यांना सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम देखील केले.
विक्कीचे नशिब 2015 बदलले आणि अभिनेत्याला ‘मसान’ या छोट्या बजेट चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटात तो मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटात विक्कीच्या अभिनयाला चाहत्यांनी खूप पसंती दिली होती. या चित्रपटाद्वारे त्याने आपला दमदार अभिनय सर्वांसमोर सादर केला. या चित्रपटानंतर विक्कीने बर्याच चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली.
2019 मध्ये विक्कीला आपली खरी ओळख मिळाली. ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटात विक्की मुख्य भूमिकेत अर्थात मेजर विहान शेरगिल या व्यक्तिरेखेत दिसला होता. या चित्रपटाने यशाचा नवा विक्रम स्थापित केला होता. या चित्रपटातून विक्कीने प्रचंड लोकप्रियता मिळविली. आज विक्की बॉलिवूडच्या सर्वोत्कृष्ट कलाकारांपैकी एक बनला आहे.