राज्यसभेत झालेल्या गोंधळानंतर याप्रकरणाला आता गंभीर स्वरुप आले आहे. विरोधकांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहे. 40 ते 50 मार्शल यांना बोलावून खासदारांसोबत गैरवर्तन करण्यात आले आहे. गेल्या 55 वर्षांच्या संसदीय राजकारणात असे काही पाहिलेले नाही, असा हल्लाबोल राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केला आहे. मी माझ्या 55 वर्षांच्या संसदीय राजकारणात हे प्रथमच पाहत आहे. आमच्या पुरुष खासदारांना रोखण्यासाठी महिला मार्शलचा वापर केला जात आहे. तर महिलांना रोखण्यासाठी पुरुष मार्शलचा वापर करुन गैरवर्तन करण्यात आले आहे, असे पवार यांनी म्हटले आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात (Parliament Monsoon Session) राज्यसभेत (Rajya Sabha) मंगळवारी पेगॅसस आणि कृषी कायद्यांवरुन विरोधकांनी जोरदार गदारोळ घातला. दरम्यान, काही विरोधी खासदारांनी टेबलावर चढून गोंधळ घातला. याप्रकारानंतर राज्यसभेचे सभापती सभापती व्यंकय्या नायडू (Venkaiah Naidu) भावूक झाले. दरम्यान, राज्यसभेत ओबीसी (OBC) विधेयक मंजूर झाल्यानंतर विमा विधेयकावर (INSURANCE BILL) चर्चा सुरू झाली. त्यानंतर विरोधकांचा गदारोळ सुरू झाला होता. या गोंधळानंतर मार्शलना बोलावण्यात आले.गोंधळानंतर मार्शलांनी गोंधळ घालणाऱ्या खासदारांना सभागृहाबाहेर काढले. दरम्यान, या घटनेनंतर, राज्यसभेचे कामकाज विस्कळीत झाल्याबद्दल एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केल्यानंतर संसदेचे पावसाळी अधिवेशन नियोजित समाप्तीच्या दोन दिवस आधी संपविण्यात आले.
राज्यसभेत विरोधकांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केला आहे. मार्शलला बोलावून गैरवर्तन करण्यात आले. 40 ते 50 मार्शल यांना बोलावून खासदारांसोबत हे गैरवर्तन करण्यात आले आहे. जेथे मार्शल विरोधी खासदारांशी गैरवर्तन करत आहेत. या गैरवर्तनानंतर राज्यसभेत विरोधी पक्षांच्या खासदारांनी वॉकआउट केला, अशी माहिती काँग्रेसचे नेते खासदार मल्लिकार्जुन खरगे यांनी देत हे आरोप केले. दरम्यान, हे आरोप संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी फेटाळून लावले आहेत.
मी माझ्या 55 वर्षांच्या संसदीय राजकारणात असे काही पाहिले नाही. आमच्या पुरुष खासदारांना रोखण्यासाठी महिला मार्शलचा वापर केला जात आहे. तर महिला खासदारांना रोखण्यासाठी पुरुष मार्शलचा वापर केला जात आहे, असा गंभीर आरोप शरद पवार यांनी केला आहे. माझ्यासंसदीय राजकारणात मी यापूर्वी कधीही पाहिले नाही, असे ते म्हणाले.
संसदीय कारकिर्दीत आज राज्यसभेत महिला खासदारांवर ज्याप्रकारे हल्ले झाले ते मी पाहिले नाही. 40 पेक्षा जास्त पुरुष मार्शल आणि महिला मार्शल बाहेरून सभागृहात आणले गेले. हे अतिशय दुःखद आणि वेदनादायक आहे, हा लोकशाहीवर हल्ला आहे, असे शरद पवार म्हणाले.
तर काँग्रेस खासदार छाया वर्मा म्हणाल्या, “मला पुरुष मार्शलनी ढकलले आणि त्यानंतर मी खाली पडले. मी मध्यस्ती करण्यास गेले असताना माझ्याबाबत हा प्रकार घडला आहे. मी मध्यस्तीतून जो मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असताना सभागृहात जमिनीवर पडले.”