टीमला वर्ल्ड कप जिंकवून देण्यात सहभागी असलेल्या खेळाडूवर मात्र सध्या खूप वाईट परिस्थिती ओढवली आहे. या खेळाडूला स्वत:चं पोट भरण्यासाठी मोल मजुरी करण्याची वेळ आली आहे.
2018 मध्ये दृष्टिहीनांसाठी विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा हा खेळाडू एक भाग होता. शारजाह येथे झालेल्या अंतिम सामन्यात त्याच्या संघाने पाकिस्तानचा पराभव केला. मात्र याच खेळाडूवर आता स्वत:चं पोट भरण्यासाठी मोलमजुरी करण्यावाचून दुसरा पर्याय उरला नाही. दैनंदिन गरजा भागवण्यासाठी तो मजूर म्हणून काम करत आहे.
नरेश तुमडा असं या खेळाडूचं नाव आहे. त्याने वयाच्या 5 व्या वर्षापासून क्रिकेट खेळायला सुरुवात केली. आपली प्रतिभा आणि प्रचंड मेहनतीच्या जोरावर त्याने 2014 मध्ये गुजरातच्या टीममध्ये आपली एक वेगळी जागा एक स्थान निर्माण केलं. त्यानंतर त्याची राष्ट्रीय टीममध्येही निवड करण्यात आली. मात्र आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्याने आता आता घर चालवण्यासाठी मजुरी करावी लागत आहे.
त्याने सरकारी नोकरी मिळवण्यासाठी देखील अनेक प्रयत्न केले मात्र तिथून कोणतंही उत्तर त्याला मिळालं नाही. सरकारकडून मदत मागण्याचा प्रयत्न केला. त्याला दिवसाला 250 रुपये मिळतात त्याने अनेकदा यासंदर्भात सरकारकडे आपली समस्या मांडली मात्र त्यावर अजूनपर्यंत कोणतंही उत्तर मिळू शकलं नाही.
नरेशवर पाच लोकांची जबाबदारी आहे. त्याच्या घरात तो एकटा कमवतो. भाजी विकून जे पैसे येतात ते घर चालवण्यासाठी वापरले जातात. मात्र तेवढ्यात घराचा खर्च भागत नसल्याने आता मजुरी देखील नरेश करत आहे. 29 वर्षा नरेशच्या हातात आता क्रिकेट बॅट ऐवजी विटा असतात.
जेव्हा टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकून आले तेव्हा त्यांना नोकऱ्या आणि भरगोस पैसे बक्षीस म्हणून देण्यात आले. आम्हाला दिसत नाही म्हणून आम्हाला कमी महत्त्व दिलं जातं का? असा सवाल त्याने यावेळी उपस्थित केला आहे. समाजाने आमच्यासोबत समानतेनं वागायला हवं असंही तो यावेळी म्हणाला.
20 मार्च 2018 को ब्लाइंड वर्ल्ड कप ज्यावेळी टीमच्या खेळाडूंना मिळाला त्याचा नरेश एक भाग होता. त्याने उदरनिर्वाहासाठी सुरुवातीला भाजी विक्री सुरू केली. मात्र कोव्हिडमुळे हा छोटा उद्योगही बंद पडला. त्यामुळे सध्या मजुरी करून स्वत:चं आणि घरच्यांचं पोट भरण्याची वेळ नरेशवर आली आहे.
(फोटो क्रेडिट गुगल)