आज मंगळवार दिनांक. 10 ऑगस्ट 2021. तिथी श्रावण शुद्ध द्वितीया. आज मंगळागौरीचे व्रत नवविवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करतात. आज चंद्र दिवसभर सिंह राशीतून भ्रमण करेल. आजचे बारा राशींचे भविष्य जाणून घेऊ.
मेष
दिवस चांगला असून गृह,कुटुंब , संतती या बाबतीत लक्ष घालण्याचा आहे. अध्यात्मिक साधना करण्यासाठी फार शुभ काळ. विद्यार्थ्यांना दिवस अनुकूल आहे. आर्थिकदृष्ट्या समाधानकारक.
वृषभ
राशीत असलेला राहु निर्णय घेताना थोडी द्विधा मनस्थिती करतील.वैचारिक गोंधळ निर्माण होईल. शेजार्यांची काही तक्रार असेल तर लौकर लक्ष द्या. प्रकृती उत्तम राहील. घर काम जास्त वेळ घेईल. दिवस चांगला आहे.
मिथुन
आज होणारे प्रवास फायदा करून देतील. गुरु भाग्यस्थानात शुभ आहे अष्टम शनी व तृतीय मंगळ व्यवहार सांभाळुन करा हे सांगतात. प्रकृती जपा. चतुर्थ स्थानी आलेला शुक्र घरासाठी, आईसाठी काही खरेदी करायला लावेल. दिवस चांगला आहे.
कर्क
आज राशीच्या धनस्थानातील चंद्र भ्रमण शुभ संकेत देत आहे. आर्थिक बाजू भक्कम राहील. अचानक धनलाभ संभवतो. तृतीय शुक्र अधिकारी व्यक्तीशी सांभाळून बोला. फायदा होईल. डोळ्याची काळजी घ्या. दिवस अनुकूल आहे.
सिंह
राशीत असलेला चंद्र, व्यय स्थानातील सूर्य अनेक संधी निर्माण करतील. गुरु चंद्र दृष्टी योग शुभ आहे. मंगळ नवीन खर्च उभे करायला तयार आहे. पण काळजी नको. शुक्र आर्थिक लाभ करून देईल. गुरु उपासना करावी.
कन्या
आज दिवस फारसा अनुकूल नाही. विचित्र अशी हुरहूर जाणवेल. खर्च होईल. नवीन काम सुरू होईल. दागदागिने आकर्षित करतील. .मुलांची अवाजवी चिंता करू नका. गुरु जप करणे योग्य ठरेल.
तुला
आज दिवस लाभदायक आहे .आवडत्या व्यक्तीला भेटावेसे वाटेल. केलेल्या कामाची प्रशंसा होईल.कामाचे फळ देणारा दिवस. वडील व्यक्तींची काळजी घ्या. त्यांना वेळ द्या.
दिवस शुभ.
वृश्चिक
आज तुमचा मान वाढेल. तसेच काम ही वाढेल. जास्त ताण घेऊ नका. प्रकृतीच्या तक्रारी कडे दुर्लक्ष करू नका. जोडीदाराला काही नवीन वस्तू मिळू शकतात. दिवस चांगला आहे.
धनु
भाग्यशाली दिवस. ताण कमी होईल. छोटे प्रवास, मौजमजेसाठी वेळ जाईल. किंवा त्यासंबंधी चर्चा होईल. तुमच्या बुद्धीचा उत्तम वापर करून घ्या. भविष्याचे आर्थिक नियोजन करा.
मकर
मानसिक ताणतणाव, आर्थिक नुकसान, संतती चिंता असा हा दिवस आहे. पण गुरु महाराज सगळ्यातून बाहेर काढतील. विश्वास ठेवा. मधुमेही व्यक्तीनी जास्त काळजी घ्या. खाण्या पिण्याचे बंधन पाळा. दिवस मध्यम.
कुंभ
दिवस आनंदी आहे. मौजमजेसाठी वेळ काढा. जोडीने फिरायला जा. किंवा घरात काही विशेष पुजा करा. शत्रूकडे लक्ष असू द्या. साडेसाती सुरू आहे. शनी जप करा. दिवस शुभ.
मीन
आज काहीसा विचित्र थकवा येईल. खर्च करावा, कर्ज घ्यावे असे वाटेल. पण सावध. कोणाला हेवा वाटेल असे सध्या काही करू नका. शांततेत आपले काम करत रहा असे ग्रह सुचवतात..दिवस मध्यम शुभम भवतु..