देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत 2 हजारांनी वाढ झाली. कालच्या दिवसात 44 हजार 643 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. कालच्या दिवसात 464 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने दिलासा मानला जात आहे.
गेल्या 24 तासात भारतात 44 हजार 643 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 464 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 41 हजार 96 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.
भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 18 लाख 56 हजार 757 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 10 लाख 15 हजार 844 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 26 हजार 754 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 4 लाख 14 हजार 159 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.
आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 49 कोटी 53 लाख 27 हजार 595 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. (फोटो क्रेडिट गुगल)