स्थिर झालेली कोरोना रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढत आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेला सुरुवात झाली का? असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात उपस्थित होत आहे. केरळ आणि महाराष्ट्राने देशाची चिंता वाढवली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, मागील 24 तासांत कोरोनामुक्त रुग्णांपेक्षा कोरोनाबाधित रुग्णांचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळेच उपचाराधीन रुग्णांची संख्या वाढली आहे. सध्या देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या चार लाख 11 हजार 076 इतकी झाली आहे. मागील 24 तासांत 42,982 नवीन कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर 41,726 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
केरळ राज्याने देशाची चिंता वाढवली आहे.
मागील 24 तासांत केरळमध्ये 24 हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्णाची भर पडली आहे. देशाच्या एकूण रुग्णापैकी जवळपास 56 टक्के रुग्ण एकट्या केरळ राज्यातील आहेत.
देशातील सध्याची स्थिती –
एकूण कोरोनामुक्त 3,09,74,748
उपचाराधीन रुग्ण 4,11,076
एकूण लसीकरण 48.93 कोटी
देशाचा रिकव्हरी रेट 97.37 टक्के इतका झाला आहे. आठवड्याचा आणि दिवसाचा पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्केंपेक्षा कमीच आहे. देशाचा आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट 2.37 इतका आहे. तर दिवसाचा पॉझिटिव्हिटी रेट 2.58टक्के इतका झाला आहे. सलग 10 दिवस दिवसाचा पॉझिटिव्हिटी रेट 3 टक्केंपेक्षा कमी आहे.