भारताने कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा (Covid Vaccination) 100 कोटीचा टप्पा पार करून एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. केंद्रिय आरोग्य मंत्रालयाच्या महितीनुसार गुरूवार सकाळप्रर्यंत एकूण पात्र जनतेपैकी 75 टक्के लोकांना लसीचा पहिला डोस मिळालेला आहे आणि जवळपास 31 टक्के लोकंना दोन्ही डोस मिळून लसीकरण पूर्ण झाले आहे. मात्र असं असूनही भारत आता कोरोना वायरसपासून सुरक्षित आहे का? असा प्रश्न विचारला जात आहे.
तज्ज्ञांनुसार भारतात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका अजूनही पूर्णपणे टळलेला नाही . कोरोनाची लस ही विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका कमी करते आणि कोविड झाल्यास गंभीर आजारपण रोकते. मात्र आता वायरसचा जो डेल्टा व्हेरिएंट आहे तो मुळ कोरोना विषाणूपेक्षा आक्रमक आहे आणि वेगाने पसरतो ज्यामुळे कोविड संक्रमणाचा धोका वाढतो. काही देशांमध्ये डेल्टा प्लस या कोरोना विषाणू व्हेरिएंटचं संक्रमण सुरू झालंय. त्यामुळे सरकारने, आरोग्य विभागाने आणि लोकांनी तेवढीच काळजी घेणे गरजेचे आहे. येणारे सणवार आणि बाजारपेठांमध्ये सुरू झालेली लोकांची गर्दी पाहता जास्त सतर्क राहण्याची गरज आहे.
भारतात 21 ऑक्टोबरपर्यंत कोरोनाचे 14,623 नवीन रूग्ण सापडले आणि एकूण कोरोना संक्रमणाची संख्या आता 3,41,08,996 वर पोहोचली आहे. तर सक्रिय रूगणांची संख्या 1,78,098 असून रुग्णसंख्या कमी झाली आहे.
ब्रिटनमध्ये 89 टक्के लोकांचं लसीकरण झालेलं आहे. मात्र डेल्टा व्हेरिएंटमुळे तिथे कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय. मागच्या काही दिवसांपासून ब्रिटनमध्ये दररोज 40,000 पेक्षा जास्त रुग्णांची नोंद होतेय. 20 ऑक्टोबरला डेल्टा व्हेरिएंटचे 48,545 नवे रूग्ण सापडले. या सर्व रुग्णांना कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटची लागण झाल्याचं सांगितलं जातंय.
आमेरीकेतही मागच्या महिन्यात डेल्टा व्हेरिएंटमुळे संक्रमण वाढले होते आणि दररोज 1,50,000 पर्यंत रूग्ण सापडत होते. 20 ऑक्टोबरला आमेरिकेत 86,595 नवीन रूग्ण सापडले. मात्र आमेरिकेत आतापर्यंत जवळपास फक्त 50 टक्के लोकांच लसीकरण झालेलं आहे.
जगभरातल्या तज्ज्ञांमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरणावर मतभेद आहेत. लस कोरोना विषाणू तसेच व्हेरिएंड्सविरूद्ध किती प्रभावी आहे याचेही चित्र स्पष्ट नाही. त्यामुळे जगभरात किंवा भारतात कोरोना रुग्णांची संख्या वाढेल का किंवा कधी वाढेल याचा अंदाज लावणे कठीण आहे.
भारतात 16 जानेवारीला 2021 ला लसीकरण मोहिमेला सुरूवात झाली आणि 10 महिन्यात 100 कोटीचा टप्पा पार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2021 आखेरपर्यंत 100 टक्के पात्र लोकांच लसीकरणा करण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. मात्र कोविडचं संक्रमण नियंत्रणात ठेवायचं आसेल तर लोकांनी लसीकरणासोबत कोरोना प्रतिबंधक नियम पाळणे गरजेचं आहे.