शेगाव संस्थानचे विश्वस्त
शिवशंकर भाऊ पाटील यांचे निधन
श्री संत गजानन महाराज शेगाव संस्थानचे विश्वस्त शिवशंकर भाऊ पाटील यांचे आज दुपारी ५ वाजता निधन झाले. वयाच्या ८२ व्या वर्षी वृद्धापकाळाने शेगाव येथे त्यांची प्राणज्योत मालवली. तर, करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शेगावमध्ये भाविकांनी गर्दी करू नये, असं आवाहन संस्थानच्यावतीने करण्यात आलेलं आहे
कोरोना बाधितांची संख्या वाढल्याने
जपानमध्ये आणीबाणी घोषित
जागतिक ऑलम्पिक स्पर्धा होत असतानाच जपानमध्ये हाहाकार सुरू झाला आहे. त्याची गंभीर दखल घेत जपानमध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. मोठ्या हिंमतीने ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या जपानमध्ये सध्या कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. जपान मेडिकल असोसिएशनच्या प्रमुखांनी तीव्र चिंता व्यक्त करत देशव्यापी आणीबाणी केली आहे. एखाद्या भयानक आगीप्रमाणे पसरणाऱ्या या संसर्गावर नियंत्रण कसे मिळवावे, या विवंचने सरकार व प्रशासन आहे. तर, हॉस्पिटलमध्ये बेडच्या उपलब्धतेवरही मोठा परिणाम झाला आहे.
पदवी प्रवेशासाठी CET
परीक्षा घेतली जाणार
राज्य शिक्षण मंडळानं बारावी परीक्षेचा निकाल लावला. राज्याचा सरासरी निकाल ९९ टक्क्यांच्या वर लागला. त्यामुळे आता इतक्या विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश कसे मिळणार? अशी चर्चा सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून पदवी प्रवेशासाठी CET परीक्षा घेतली जाण्याची चर्चा सुरू होती. मात्र, अशी कोणतीही सामाईक प्रवेश परीक्षा घेतली जाणार नसून बारावीच्या निकालांच्या आधारावरच पदवी परीक्षेचे प्रवेश होणार असल्याचं राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यासंदर्भात निर्णय जाहीर केला असल्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
एमपीएससीची संयुक्त पूर्वपरीक्षा
४ – सप्टेंबर रोजी होणार
एमपीएससीची संयुक्त पूर्वपरीक्षा आता ४ – सप्टेंबर रोजी होणार असून त्याचे परिपत्रक आ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने काढले आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा ‘अराजपत्रित गट बांसाठी ही परीक्षा घेतली जाणार आहे. ही परीक्षा अगोदर ११ एप्रिल रोजी होणार होती. पण, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ती पुढे ढकलण्यात आली. राज्य शासनाच्या आप व्यवस्थापन विभागाकडून ३ ऑगस्ट रोजी परीक्षेला परवानगी देणारे पत्र प्राप्त झाल्यानंतर आयोगाने हा निर्णय घेतला आहे. परीक्षेच्या पुढील अपडेटस साठी आयोगाच्या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन आयोगाने केल आहे.
युपीएससी आणि टी.ई.टी
परिक्षा एकाच दिवशी
महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेच्या वतीने येत्या १० ऑक्टोबर रोजी टी.ई.टी परिक्षा घेण्यात येणार आहे. त्याच दिवशी केंद्रीय लोकसेवा आयोगाची (युपीएससी) पुर्वपरिक्षा आहे. त्यामुळे राज्यातील दोन्ही परिक्षा देणार्या हजारो उमेदवारांना हा निर्णय गैरसौयीचे ठरणार आहे. एकाच दिवशी दोन्ही परिक्षा असल्यामुळे टी.ई.टी वेळापत्रकात बदल करण्याची मागणी पुणे येथील दत्ताञय फडतरे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केली.
दुर्मिळ आजारावरील उपचाराची
सुविधा नायर रुग्णालयात
लहान मुलांमध्ये आढळून येणाऱ्या ‘स्पायनल मस्क्युलर अॕट्रोफी’ या दुर्मिळ आजारावरील महागडी उपचाराची सुविधा येथील नायर रुग्णालयात सुरू करण्यात आली आहे. यामुळे योग्यवेळी उपचार मिळाल्याने या मुलांना नवजीवन मिळेल, अ विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे व्यक्त केला. या सुविधेसोबतच मुंबईत जिनोम सिक्वेंसिंग लॅब देखील सुरू करण्यात आली असून कोरोनाविरुद्धच्या लढ्याला त्यामुळे बळ प्राप्त झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
कुस्तीपटू रवी कुमार दहिया
५७ किलो गटात फायनलमध्ये
टोकियो ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू रवी कुमार दहिया ५७ किलो गटात फायनलमध्ये पोहचला आहे. रवी कुमारने सेमी फायनमध्ये कझाकस्तानच्या पैलवानाचा पराभव केला आहे. या आनंदाच्या बातमीनंतर दहियाच्या घरी जल्लोष व्यक्त केला जात आहे. रवी कुमारच्या या यशामुळे भारताचे आणखी एक पदक निश्चित झाले आहे. ऑलिम्पिकमध्ये भारतीय कुस्तीपटूंनी चांगली कामगिरी केली आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला हे चौथे पदक ठरणार आहे.
२२ वर्षांनंतर ज्येष्ठांसाठीचे
धोरण येणार
देशातील नागरिकांमध्ये अत्यंत – महत्त्वाचा घटक असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. देशात तब्बल २२ वर्षांनंतर ज्येष्ठांसाठीचे धोरण येणार आहे. हे धोरण सध्या अंतिम टप्प्यात आहे. येत्या काही महिन्यातच ते केंद्र सरकारकडून लागू केले जाण्याची चिन्हे आहेत.
पंढरपूरला जवळपास
पन्नास हजार भाविक दाखल
कोरोना काळात सगळीच धार्मिक स्थळे बंद आहेत. त्याला पंढरपूरचे विठ्ठल-रुक्मिणीचे मंदिरही अपवाद नाही. तरीही कामिका एकादशीनिमित्त बुधवारी पंढरपूरला जवळपास पन्नास हजार भाविक दाखल झाले आहेत. मंदिर बंद असल्याने भाविक चंद्रभागेत स्नान करून संत नामदेव पायरी आणि कळसाचे दर्शन घेऊन परतत आहेत. एकच गर्दी झाल्याने प्रशासनाकडून मंदिर परिसरात तसेच प्रदक्षिणा मार्गावर सर्व भाविकांची कोरोना चाचणी केली जात आहे. कोरोना नियमांचे पालन करण्याच्या सूचनाही दिल्या जात आहेत.
EPFO ची योजना, नोकरदारांना
7 लाखांचा मोफत विमा
कोरोना संकटामुळे सध्या अनेकांची आर्थिक अवस्था बिकट झाली आहे. नोकऱ्या कशाबशा वाचलेले कर्मचारीही वाढीव खर्चामुळे मेटाकुटीस आले आहेत. या पार्श्वभूमीवर भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) नोकरदारांसाठी अनेक सुविधा सुरु केल्या आहेत. यापैकीच एक म्हणजे एम्पॉई डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स स्कीम (EDLI Scheme). या योजनेतंर्गत कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या विम्याची रक्कम सहा लाखावरुन सात लाखापर्यंत वाढवण्यात आली आहे.
पोलिसांच्या कुटुंबीयांना बेघर
होऊ देणार नाही : प्रविण दरेकर
नायगाव येथील पोलीस वसाहतीत राहणाऱ्या पोलिसांना अचानक घरे खाली करण्याच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. त्याला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी कडाडून विरोध केला आहे. वेळ पडल्यास बुलडोझरखाली आडवे पडू, पण पोलिसांच्या कुटुंबीयांना बेघर होऊ देणार नाही, असा इशारा प्रविण दरेकर यांनी दिला आहे.
कौमार्य चाचणी विषय
अभ्यासक्रमातून वगळला
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या आक्षेपानंतर कौमार्य चाचणी हा विषय वैद्यकीय अभ्यासक्रमातून काढून टाकण्याचा निर्णय महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने घेतलाय. विद्यापीठाच्या या निर्णयाचं अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी स्वागत केलं आहे. याआधी वैद्यकीय अभ्यासक्रमात बलात्कार पीडित महिलांची कौमार्य चाचणी कशी घ्यावी हा भाग शिकवला जात होता. याला अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील व कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी एका निवेदनाद्वारे आक्षेप घेतला. तसेच हा विषय अभ्यासक्रमातून वगळण्याची मागणी केली होती. त्याची दखल महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठने घेतली.
तोपर्यंत साहित्य
संमेलन होणार नाही
जोपर्यंत कोरोना विषाणूची साथ कमी होणार नाही तोपर्यंत साहित्य संमेलन (Marathi Sahitya Sammelan) होणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने घेतला आहे. मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील (Kautikrao Thale Patil) यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे होणार आहे. मात्र, कोरोना साथीमुळे ते पुढे ढकलण्यात आले आहे.
SD social media
9850 60 3590