ज्योतिष हे शास्त्र आहे-डॉ. ज्योती जोशी; रोटरी जळगाव सेंट्रलतर्फे व्याख्यान

विज्ञान युगात ही धर्म आणि शास्त्र यांचे महत्त्व अबाधीत असून ज्योतिष हे शास्त्र आहे असे डॉ. ज्योती जोशी यांनी प्रतिपादन केले.
गणपती नगरातील रोटरी हॉलमध्ये “ज्योतीष शास्त्र काल,आज, उद्या व राशी आणि नातीगोती” या विषयावरील व्याख्यानात त्या बोलत होत्या. मंचावर अध्यक्ष विपुल पारेख, सहसचिव दिनेश थोरात यांची उपस्थिती होती.
यावेळी डॉ. जोशी यांनी भाग्य आणि भविष्य कोणी बदलू शकत नाही. मात्र त्याची दाहकता, तीव्रता कमी करु शकतो. आधुनिक गुण मिलन पद्धतीबद्दल माहिती देऊन गायत्री मंत्र नेहमी म्हटला पाहिजे, जेवणापूर्वी म्हटला तर अधिक उत्तम असे सांगितले. सुमारे एक तास चाललेल्या व्याख्यानात डॉ. जोशी यांनी कुंडली विषयी सविस्तर माहिती देत १२ राशी व त्या राशी असलेल्या व्यक्तींचे स्वभाव याचे पैलू उलगडून सादर केले.
परिचय साधना गांधी यांनी तर आभार डॉ. प्रिती पाटील यांनी मानले. कार्यक्रमास रोटरी सेंट्रलच्या सदस्यांची कुंटुंबीयासह मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.