सध्या हंगामात बदल होत असल्याने व्हायरल ताप येण्याची भीती वाढत चालली आहे. म्हणूनच आम्ही तुम्हाला याबाबत काही घरघुती उपाय सांगत आहोत.
व्हायरल ताप लक्षणे :
● घशात वेदना, डोके दुखी, डोळे लाल होणं, कपाळ तापणे, खोकला, थकवा, उलटी,आणि अतिसार
● हा ताप एका व्यक्तीकडून दुसऱ्याला सहज होऊ शकतो.
● हळद आणि सुंठ पूड : यासाठी एक चमचा हळद, एक चमचा सुंठपूड आणि थोडी साखर मिसळा. आता हे एक कप पाण्यात मिसळून गरम करा आणि नंतर थंड करून पिऊन घ्या.
● तुळस : एक चमचा लवंग पावडरमध्ये 10-15 ताजे तुळशीची पाने 1 लिटर पाण्यात मिसळून ते पाणी अर्ध होईपर्यंत उकळवून घ्या. गाळून थंड करून दर एका तासाने पिऊन घ्या.
● धणे घालून चहा : धण्यात औषधी गुणधर्म आढळतात. याचा चहा बनवून प्यावा. यामुळे देखील व्हायरल ताप बरा होतो.
● मेथीचे पाणी : एक कप मेथीदाणे रात्रभर भिजत घाला आणि सकाळी गाळून दर एक तासाने पिऊन घ्या.
● लिंबू आणि मध : आपण मध आणि लिंबाच्या रसाचे सेवन करू शकता. हे व्हायरल तापाच्या प्रभावाला कमी करते.
डॉ.निलेश केंगे ,नाशिक