ग्राहकांच्या समाधानाला प्राधान्य देत उमेश पाटील यांनी केली व्यावसायिक प्रगती
व्यवसायाची प्रगती गाठत असताना केशराई इंटरप्राईजेसचे उमेश पाटील यांनी गुणवत्तेला प्राधान्य दिले आहे. त्यामुळेच स्पर्धेच्या काळातही उमेश पाटील यांचे ग्राहक समाधानी आहेत. ग्राहकांच्या समाधानाच्या बळावर उमेश पाटील यांनी व्यवसायिक प्रगतीची आणि सामाजिक कर्तृत्वाची क्षितिजे पार केलेली आहेत.
उमेश पाटील यांचे केशराई एंटरप्राइजेस हे अद्ययावत शोरूम उभे आहे, यामध्ये UTL SOLAR आणि RAYON या नामांकित कंपन्यांची डीलरशिप आहे. आता अलीकडच्या काळामध्ये उमेश पाटील यांच्या केशराई एंटरप्राइजेसला ISO 9001 2001 हे गुणवत्ता दर्जाचे प्रमाणपत्र नुकतेच मिळाले आहे.
सोलर आणि एलईडी च्या उत्पादनांमध्ये अग्रेसर असलेल्या नामांकित UTL SOLAR आणि RAYON या दोन कंपन्यां बरोबर काम करण्याची संधी उमेश पाटील यांना मिळाली आहे. उद्योगाचा विस्तार जळगाव, धुळे, नंदुरबार या तीन जिल्ह्यात विस्तारला आहे. 100+ डीलर, 50+ कॉन्ट्रॅक्टर, 20+ कारखाने आणि 400+ ग्रामपंचायती इतका विस्तार उमेश पाटील यांनी आपल्या उद्योगाचा केलेला आहे. उमेश पाटील यांनी नाविन्यपूर्ण प्रयोग राबवत सोलर च्या प्रॉडक्ट विक्रीसाठी प्रयत्न केले आणि ते यशस्वी झाले.
नव्या क्षेत्रामध्ये प्रवेश
व्यावसायिक प्रगतीची संधी शोधत असताना उमेश पाटील नेहमी नाविन्यपूर्ण प्रयोग राबवत असतात. अलीकडच्या काळामध्ये त्यांनी आपल्या नियमित व्यवसायाबरोबरच अनेक गोष्टी सुरु केलेल्या आहेत ज्यामध्ये.. LED बल्ब, LED ट्यूब लाईट, पॅनल लाईट,
इन्व्हर्टर, बॅटरी, सोलर सिस्टिम, LED स्ट्रीट लाईट, सोलर स्ट्रीट लाईट, फॉगिंग मशीन, कचराकुंड्या, घंटागाडी, शाळा/अंगणवाडी बेंच, रंगरंगोटी, फर्निचर, खेळणे, शवपेटी, आर. ओ. प्लांट, सोलर इन्व्हर्टर सिस्टिम, सोलर वॉटर हिटर, सोलर पंप, इन डोअर/आऊट डोअर जिम, इत्यादी. गोष्टींचा समावेश करता येईल.
सामाजिक कार्यात आघाडी
केवळ व्यवसायाला प्राधान्य न देता विविध सामाजिक कार्यामध्ये उमेश पाटील आणि केशराई इंटरप्राईजेस सहभागी होत असतात. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत केशराई इंटरप्राईजेसच्या संचालिका सौ. हेमलता उमेश पाटील यांचा नुकताच माय एफ एम तर्फे गौरव करण्यात आला आहे. हा गौरव म्हणजे त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याची पावतीच म्हणता येईल.
विविध उत्पादनांची शृंखला उपलब्ध
केशराई एंटरप्राइजेसमध्ये खालील उत्पादने उपलब्ध आहेत. इन्व्हर्टर/ बॅटरी, सोलर सिस्टिम, सोलर वॉटर हिटर, गॅस गिझर, LED टि.व्ही., RO प्युरिफायर, स्टॅबीलायझर, सोलर वॉटर पंप, LED स्ट्रीट लाईट/फ्लड लाईट, LED इंडस्ट्रीयल लाईट, सोलर स्ट्रीट लाईट ही सर्व उत्पादने उच्च दर्जाची गुणवत्ता पूर्ण असून वाजवी किमतीत उपलब्ध आहेत. सोलर आणि इतर विविध वस्तूंची भली मोठी रेंज आपल्याला पाहायला मिळते. विशेष म्हणजे या वस्तू EMI च्या सुविधेने घेता येणार आहेत. इन्व्हर्टर बॅटरी च्या क्षेत्रात EMI वर वस्तू उपलब्ध करून देणारी UTL SOLAR ही पहिली आणि कदाचित एकमेव कंपनी आहे. लहान वस्तू पासून ते मोठ्या उत्पादना पर्यंत याठिकाणी EMI ची सुविधा उपलब्ध झालेली आहे. उत्पादनाच्या 80 टक्के रकमेवर ही सुविधा दिली जाते. ग्राहकांचे हित लक्षात घेऊन ही सुविधा इथे उपलब्ध करण्यात आलेली आहे. ग्राहकांनी मोठ्या संख्येने या सुविधेचा लाभ घ्यायला हवा असे आवाहन उमेश पाटील यांनी केले आहे.
केशराई इंटरप्राईजेस मध्ये जवळपास 17 कर्मचारी सहकारी कार्यरत आहेत. उमेश पाटील यांच्या प्रयत्नातून 17 जणांना रोजगाराची संधी उपलब्ध झालेली आहे, जळगाव धुळे नंदुरबार या तीन जिल्ह्यांमध्ये यशस्वी ग्राहकांची मोठी साखळी त्यांनी निर्माण केली आहे, हेच त्यांच्या यशाचे आणि भरभराटीचे रहस्य आहे.
श्री.उमेश पाटील यांचा संपर्क क्रमांक
90969 68197