सांगलीच्या पूरग्रस्त परिसरामध्ये अजस्त्र मगरींचा वावर

सांगलीच्या पूरग्रस्त परिसरामध्ये मोठ्या, अजस्त्र मगरींचा वावर सहजरित्या सुरू असल्याने या परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.

सांगलीच्या कृष्णाकाठ परिसरात पूर्वीपासूनच मगरींचा वावर आहे. वाळवा, बुरली, आमणापूर, नांदरे, वसगडे, कर्नाळ, भिलवडी, तुंग, ब्रम्हणाल या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात मगरी आढळतात. यापूर्वी पूर नसताना मगरींच्या सतत होणाऱ्या हल्ल्यात या परिसरातील अनेक नागरिकांचा बळी गेलेला आहे.

त्यातच आता गेल्या 10 दिवसात पूरस्थिती गंभीर असल्यामुळे नागरी वस्तीत मगरी शिरल्या आहेत. गावात, शिवारात मगरींचा वावर वाढला आहे. पूर पट्ट्यात अनेक भागात मगरी मुक्तपणे फिरत आहेत. नागरी वस्तीमधील परिसरात पुराच्या पाण्याच्या आधाराने अनेक मगरी फिरत आहेत. त्यामुळे पाणी ओसरल्यानंतर मगरीचा धोका निर्माण झाला आहे.

पुरानंतर आता मगरींचा धोका कायम असल्याने पुरपट्टा धास्तावला आहे. दोन दिवसापूर्वीच कर्नाळ रोड वरील पाण्यात फिरणाऱ्या हा मगरीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.