क्रिकेटपटूने पाठविले अल्पवयीन मुलींना अश्लील मेसेज

क्रिकेटच्या विश्वात खेळाडू हे कायमच त्यांच्या अनोख्या अंदाजासाठी, दमदार प्रदर्शनासाठी आणि इतरही अनेक कारणांसाठी ओळखले जातात. पण, अनेकदा या ‘इतर’ कारणांमुळे खेळाडूंच्या कारकिर्दीला धोकाही पोहोचतो. अशीच काहीशी परिस्थिती इंग्लंडचा खेळाडू डेविड हायमर्स याच्यापुढं उदभवली आहे.

इंग्लिश क्लब क्रिकेटच्या नैतिक मुल्यांचं उल्लंघन केल्यामुळं सध्या हा खेळाडू चर्चेत आला आहे, ज्यामुळं त्याच्या संपूर्ण कारकिर्दीलाच धोका निर्माण झाला आहे. या 29 वर्षीय खेळाडूला इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डानं निलंबित केलं आहे.

अल्पवयीन मुलींना पाठवायचा अश्लील मेसेज
David Hymers अल्वयीन मुलींना अश्लील मेसेज पाठवत असे अशी धक्कादायक बाब नुकतीच समोर आली आहे. ‘द मिरर’च्या वृत्तानुसार गार्डियन्स ऑफ नॉर्थ या ग्रुपनं हायमर्सला पकडण्याची योजना आखली. या ग्रुपनं सोशल मीडियावर अल्पवयीन मुलींचे बनावट अकाऊंट तयार केले, ज्याचा अंदाजही या खेळाडूला आला नव्हता.
हे अकाऊंट शालेय मुलींचेच आहेत असं समजून डेविडनं त्यावर अश्लील मेसेज पाठवले. इतकंच नव्हे तर हा खेळाडू मुलींना गुप्तांगांचेही फोटो पाठवत असे, असं म्हटलं गेलं. 2020 पासून त्याचे हे कारनामे सुरुच होते. आता मात्र पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असून, अनिश्चित काळासाठी त्याला क्रिकेट बोर्डानंही निलंबनाची शिक्षा दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.