अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. दिवसागणिक त्याच्या अडचणींमध्ये वाढ होत आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणात मुंबई क्राईम ब्रांचने शुक्रवारी राज आणि शिल्पाच्या बंगल्यावर छापेमारी केली. सोबतचं पॉर्नोग्राफी प्रकरणात क्राईम ब्रांचने शिल्पा शेट्टीचा जबाब देखील नोंदवला. क्राईम ब्रांचच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चौकशी दरम्यान शिल्पा चार वेळा रडली.
यावेळी शिल्पा शेट्टी क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांना अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. पॉर्नोग्राफी प्रकरणामुळे आमच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. शिवाय अनेक ब्रांड्सने माझ्यासोबत काम करण्यास नकार दिला आहे. त्याचप्रमाणे अनेक प्रोजेक्ट देखील माझ्या हातून गेले आहेत.
एवढंच नाही तर वियान इंडस्ट्रीजमधील शेअर होल्डींगबद्दल देखील क्राईम ब्रांचने जवळपास तीन ते चारवेळा शिल्पा आणि राजला समोरा-समोर बसवून चौकशी केली. पॉर्नोग्राफी प्रकरणात क्राईम ब्रांचने शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राला अनेक प्रश्न विचारले.
• तुम्हाला हॉटशॉटबद्दल माहिती आहे, ते कोण चालवतं?
• हॉटशॉटच्या व्हिडिओ कंटेंटबद्दल तुम्हाला काही माहिती आहे?
• तुम्ही कधी हॉटशॉटच्या कामामध्ये सहभागी होत्या?
• कधी प्रदीप बक्षीसोबत हॉटशॉटबद्दल तुमचं कधी बोलणं झालं?
• तुम्ही वियान कंपनीमधून 2020 साली का निघालात? जेव्हा कंपनीत तुमची पार्टनरशीप होती?
• पॉर्न व्हिडिओ लंडनला पाठवण्यासाठी आणि अपलोड करण्यासाठी वियान ऑफिसचा वापर केला, याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का?
• तुम्हाला राज कुंद्राच्या कामाबद्दल माहिती आहे का? त्याचा व्यवसाय काय आहे?
दरम्यान 19 जुलै रोजी मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने राज कुंद्राला चौकशीसाठी बोलावलं होतं. ही चौकशी सुमारे 2 तास चालली आणि त्यानंतर राज कुंद्राला रात्री अकरा वाजता अटक करण्यात आली. तर काल अभिनेत्री शिल्पा शेट्टीचीही कसून चौकशी करण्यात आली. राजला काल कोर्टात हजर केल्यानंतर अधिक चौकशीसाठी कोठडीत 27 जुलैपर्यंत वाढ करण्यात आली आहे.