चीनमध्ये 1,000 वर्षांनंतर इतका भयानक पाऊस झालाय की चीनची दाणादाण झालीय. सगळीकडे पाणीच पाणी आहे. रुग्णालयांमध्ये पाणी घुसलंय, रस्ते खचलेत अनेक जणांचा जीव गेलाय, काही जण बेपत्ता आहेत तर शेकडो बेघर झालेत.
चीनमधील पावसाच्या बळींची संख्या 33 झालीय, 8 जण बेपत्ता आहेत. पूरग्रस्त झेंगझोऊ शहरात रुग्णालयांमध्ये अडकलेल्या रुग्णांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
चीनमधील मुसळधार पावसाने हेनान प्रांतातील जवळपास 30 लाख लोकांना प्रभावित केलंय. एकूण 3,76,000 स्थानिय लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय.
चीनमधील एका रेल्वेस स्टेशनमध्ये पुराचं पाणी घुसल्यानं तिथं 12 लोकांचे मृत्यू झाले आणि 5 जण जखमी झालेत. भिंत पडल्यानं 2 जणांचा यात मृत्यू झालाय.
चीनमध्ये पुराच्या स्थितीत रुग्णालयात दाखल 1,075 रुग्णांपैकी 69 रुग्णांची तब्येत गंभीर आहे. पावसाने 2,15,200 हेक्टरपेक्षा अधिक भागातील पिकांचं नुकसान झालंय.
चीनमधील पावसाने केलेलं थैमान खूप दुर्मिळ असल्याचं हवामान खात्याचे जाणकार सांगत आहेत.
चीनमध्ये पाण्याचा स्तर वाढल्यानंतर एक नादुरुस्त धरण उद्ध्वस्त करण्यात आलं. ते पाणी दुसरीकडे वळवण्यात आलं.