गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर अस्थिर आहेत. आपण सोन्याच्या दरांधील चढ-उतार पाहिला तर गेल्या आठवड्यात सोन्याचे दर 410 रूपयांनी वाढले आहेत. चांदीच्या दरांत देखील 123 रूपयांनी वाढ झाली आहे. इंडिया बुलियन एन्ड ज्वैलर्स एसोसिएशनच्या म्हणण्यानुसार गेल्या महिन्यात म्हणजे 9 जुलै रोजी सोन्याचे दर 47 हजार 863 रूपये प्रति ग्रॉम होते. तर 16 जुलैपर्यंत सोन्याचे दर 48 हजार 273 रूपयांवर पोहोचले. यानुसार सोन्याच्या दरात 410 रूपयांनी वाढ झाली आहे.
तज्ज्ञांच्या मतानुसार 2021 वर्षाअखेर सोन्याचे दर 60 हजार रूपयांचा आकडा पार करू शकतात. म्हणजे जर तुम्ही सहा महिन्यांमध्ये सोने या मैल्यवान धातूत पैसे गुंतवल्यास फायदा नक्कीचं होईल. येत्या काळात सोन्याचे तर गेल्या वर्षीचा रेकॉर्ड मोडू शकतात. सोन्याच्या गुंतवणुकीबद्दल सांगायचं झालं तर गेल्या वर्षी सोन्याने 28 टक्के रिटर्न्स दिलं.
त्यामुळे तुम्ही जर सोन्यात गुंतवणूक करू इच्छित असाल तर सध्या योग्य संधी आहे. शिवाय सोन्यात गुंतवणूक करणं सुरक्षित देखील आहे. सोन्यात पैसे गुंतवल्यास तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळण्याची शक्यता आहे. जागतिक बाजारपेठेतील मौल्यवान धातूंच्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम शुक्रवारी 73 रुपयांनी घसरून 47 हजार 319 रुपयांवर आला.
त्याचप्रमाणे, मागील व्यापार सत्रात सोन्याचे दर 10 ग्रॅम 47 हजार 392 रुपयांवर बंद झाले होते. चांदीही 196 रुपयांनी घसरून 68 हजार 43 रुपये प्रति किलो झाली. गेल्या व्यापार सत्रात चांदीचा दर प्रतिकिलो 68 हजार 239 रुपये होता.