पुण्यातील प्रतिष्ठित कुटुंबाला आपल्याच सुनेचा छळ करण्यास प्रवृत्त केल्या प्रकरणी बड्या राजकीय गुरुला अटक करण्यात आली आहे. रघुनाथ येंमुल याला चतुःश्रृंगी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. “तुझी बायको पांढऱ्या पायाची आहे, तिच्यामुळे तू आमदार, मंत्रीही होणार नाहीस” अशा भूलथापा लावून संबंधित कुटुंबाला महिलेचा छळ करण्यास प्रवृत्त केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.
उच्चशिक्षित सुनेला सिगरेटचे चटके, बहिरेपणा येईपर्यंत अमानुष मारहाण केल्या प्रकरणी उद्योजक पती, कुटुंबातील तिघांसह एकूण आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेतील आरोपींमध्ये येंमुलचाही समावेश आहे. रघुनाथ येंमुल हा मोठा राजकीय गुरु असल्याची माहिती आहे. प्रतिष्ठित कुटुंबाला सुनेचा छळ करण्यास प्रवृत्त केल्या प्रकरणी चतुःश्रृंगी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. रघुनाथ येंमुल याच्या अटकेने राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे
“तुझी बायको पांढऱ्या पायाची आहे, तिची जन्मवेळ चुकीची असून तिचे ग्रहमान दूषित झाले आहे. जर ही तुझी बायको म्हणून कायम राहिली, तर तू मंत्री काय, आमदारही होणार नाहीस, तिला लवकरात लवकर सोडचिठ्ठी दे आणि तुझा मुलगा तिच्याकडून काढून घे” असा सल्ला प्रतिष्ठित कुटुंबाला या राजकीय गुरुने दिल्याचं समोर आलं आहे.
27 वर्षीय पीडित विवाहितेने या प्रकरणी पोलिसात तक्रार दिली होती. जानेवारी 2017 पासून सासरच्या मंडळींकडून आपला छळ होत असल्याचा आरोप तिने केला आहे.
48 वर्षीय रघुनाथ येंमुल हा पुण्यातील बाणेरमध्ये आयव्हरी इस्टेट भागात राहतो. राजकीय क्षेत्रापासून प्रशासनापर्यंत अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांशी येंमुलचे निकटचे संबंध असल्याची माहिती आहे. अनेक जण त्याच्या दरबारात हजेरी लावत असतात. रघुनाथ येंमुल याच्या अटकेने राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.