बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या घराची एक भिंत तोडण्याची तयारी मुंबईमध्ये सुरु आहे. BMC अमिताभ बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्याची भिंत तोडणार आहे. लवकरच ही कारवाई केली जाणारये आहे. BMC ची टीम बंगल्यावर दाखल होऊन या कारवाईला आता सुरुवात करणार आहेत.
2017 मध्ये अमिताभ बच्चन यांना BMC ने नोटीस बजावली होती.पण या नोटीसला बिग बींनी कोणतं ही उत्तर दिलेलं नाही. त्यामुळे BMC ने आता या भिंतीचा जो भाग तोडायचा आहे, त्यावर मार्किंग करायला सुरुवात केलीये. या बंगल्याच्या बाजूला असलेल्या रस्त्यांची रुंदी वाढवण्यासाठी ही भिंत पाडली जाणार आहे.
बंगल्याच्या बाजूला असणारा हा रस्ता एस्कॉन टेम्पलकडे जातो. जुहूमध्ये असलेला हा बच्चन फॅमिलीचा हा पहिला बंगला आहे, या व्यतिरिक्त आणखी दोन बंगले बच्चन फॅमिलीच्या नावावर आहेत. ज्याचं नावं जनक आणि जलसा असं आहे.
BMC ही भिंत तोडून बाजूला असलेल्या रस्त्यांची रुंदी 60 फुट रुंद करणार आहे, कारण हा रस्ता फक्त 45 फूटांचा आहे. अमिताभ यांच्या घरासमोर असलेल्या या रस्त्यावर बऱ्याचदा मोठ्या प्रमाणात ट्राफिक पाहायला मिळतं. त्यामुळे BMC ने रस्ता वाढवण्याचा निर्णय घेतलंय.