संत तुकाराम महाराज व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर देहूगाव व आळंदी शहर आणि आसपासच्या परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 28 जून ते 04 जुलै पर्यंत संचारबंदी घोषित करण्यात आलीय. देहू आळंदी परिसरामध्ये आषाढी पायी वारी निमित्त मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येत असतात. त्यामुळे भाविक एकत्र येऊन गर्दी होण्याची व कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे पिंपरी चिंचवड पोलिसांनी हा संचारबंदीचा निर्णय घेतलाय
या कालावधीमध्ये देहू, आळंदीमधील सर्व प्रकारची सार्वजनिक व खासगी वाहतूक बंद राहणार आहे. देहू, आळंदी परिसरातील अत्यावश्यक वाहने तसेच स्थानिक नागरिकांना आपले ओळखपत्र दाखवून प्रवेश दिला जाणार आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व अत्यावश्यक सेवेमधील दुकाने आठवड्यातील सर्व दिवस दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु राहतील.
अत्यावश्यक दुकाना व्यतिरिक्त इतर दुकाने सोमवार शुक्रवार दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु राहतील. शनिवार व रविवार पूर्णतः बंद राहतील.
मॉल, सिनेमागृह नाट्यगृह, संपूर्णतः बंद राहतील.
रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट हे सोमवार ते दुपारी 4 वाजेपर्यंत आसन क्षमतेच्या 50% क्षमतेने सुरु राहतील. दुपारी 4 नंतर तसेच शनिवार व रविवार फक्त पार्सल सेवा / घरपोच सेवा (Home Delivery ) रात्री 11 पर्यंत सुरु राहील.
लोकल ट्रेन मधून फक्त वैद्यकीय सेवेसाठी अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी व महिलांसाठी शासकीय कर्मचारी, विमानतळ सेवा Airport Services), बंदरे सेवा ( Port Services यांच्या कर्मचाऱ्यांना प्रवास करणेस परवानगी राहील.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक ठिकाणे ( उद्याने ) खुली मैदाने, चालणे व सायकलिंग आठवड्यातील सर्व दिवस सकाळी 5 ते सकाळी 9 वाजेपर्यंत सुरु राहतील,
सूट देण्यात येत असलेल्या आस्थापना / सेवा ( Exemption Category ) व्यतिरिक्त सर्व खाजगी कार्यालये कामाचे दिवशी ( working days ) 50% कर्मचारी क्षमतेने दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु राहतील.
पिंपरी महानगरपालिका क्षेत्रातील सर्व अत्यावश्यक सेवा व कोविंड 19 व्यवस्थापनाशी संबंधित शासकीय कार्यालये 100 % क्षमतेने सुरु राहतील.