100 वर्षाच्या दानशूर लोकांच्या यादीत टाटा गृप आघाडीवर

टाटा कुटूंबाच्या दानशूरतेच्या अनेक कहान्या आपण ऐकल्या असतील. कोरोना संकटाच्या काळात देखील रतन टाटा यांनी भारतीयांना भरभरून मदत केली आहे. त्यांमुळे त्यांच्यावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव झाला. टाटा परिवाराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय.

गेल्या 100 वर्षाच्या दानशूर लोकांच्या यादीत टाटा गृपचे संस्थापक जमशेदजी टाटा यांना प्रथम क्रमांक देण्यात आला आहे. एडेल गिव्ह हूरुनतर्फे ही यादी जारी करण्यात आली आहे.

गेल्या 100 वर्षातील दानशूर लोकांबाबत तयार करण्यात आलेल्या अहवालात जमशेदजी टाटा यांनी प्रामुख्याने आरोग्य आणि शिक्षणासाठी मोठे दान दिले आहे. सध्या या दानाचा 102.4 बिलियन डॉलर्स इतकी किंमत होते.

टाटा गृपचे संस्थापक जमशेदजी टाटा यांनी 1892 पासून दिलेल्या मोठ्या देणग्यांचा या अहवालात सामावेश करण्यात आला आहे.

एडेल गिव्ह हूरून संस्थेतर्फे तयार कऱण्यात आलेल्या अहवालातील पहिल्या दहामद्ये टाटा एकमेव भारतीय आहेत. दानशूर लोकांच्या यादीमध्ये टाटा यांनी बिल गेट्स , वॉरेन बफे यांनादेखील पिछाडीवर टाकले आहे.
भारतातील मोठ्या दानशूर व्यक्तींमध्ये विप्रोचे अजीम प्रेमजी यांचाही उल्लेख येतो. या यादीत प्रेमजी यांना 12 वे स्थान देण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.