अभिनेता मनोज बाजपेयी, शरिब हाश्मी आणि अभिनेत्री समांथा अक्किनेनी स्टार वेबसीरीज ‘द फॅमिली मॅन 2’ नुकतीच प्रदर्शित झाली आहे. ‘द फॅमिली मॅन’च्या दुसऱ्या सीझनलाही पहिल्या सीझनप्रमाणेच चाहत्यांचे तितकेच प्रेम मिळाले आहे. अशा परिस्थितीत आता या सीरीजनेही आपल्या नावावर खास विक्रम नोंदवला आहे.
या सीरीजची नवीन कथा चाहत्यांना खूप आवडली आहे. ही सीरीज समीक्षकांच्या पातळीवरही चांगलीच गाजली आहे. एकीकडे प्रत्येकजण या ‘द फॅमिली मॅन’ या वेब सीरीजचे कौतुक करत आहेत, दुसरीकडे ‘द फॅमिली मॅन 2’ने एक नवीन विक्रम नोंदवला आहे.
अभिनेता मनोज बाजपेयीची ही सीरीज आयएमडीबीवरील जगातील चौथी सर्वाधिक लोकप्रिय वेब सीरीज बनली आहे, हे जाणून चाहत्यांना देखील आनंद होईल. ‘द फॅमिली मॅन 2’ जगभरातील लोकप्रिय सीरीजमध्ये चौथ्या क्रमांकाची सीरीज बनली आहे.
यासह, या सीरीजला आयएमडीबीवर 10 पैकी 8.8 स्टार देण्यात आले आहेत. या रेटिंगसह, ‘द फॅमिली मॅन 2’ जगातील सर्वोत्तम 5 वेब सीरीजच्या यादीत सामील झाली आहे.
या अनोख्या विक्रमामुळे या सीरीजने बर्याच महान आणि लोकप्रिय सीरीजना मागे टाकले आहे. आता ‘द फॅमिली मॅन 2’ ने ‘फ्रेंड्स’, ‘ग्रेज अनोटोमी’ यासारख्या मालिकांना मागे टाकले आहे. तर ‘लोकी’, ‘स्वीट टूथ’ आणि ‘मियर ऑफ ईस्टटाउन’ अद्याप फॅमिली मॅनपेक्षाही पुढे आहेत.
अभिनेता मनोज बायपेजी यांनी स्वत: चाहत्यांना या खास विक्रमाची माहिती दिली आहे. या अभिनेत्याने अलीकडेच ट्विटद्वारे चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. अभिनेत्याने लिहिले की, द फॅमिली मॅन 2 हा जगातील चौथा सर्वाधिक लोकप्रिय शो बनला आहे.