कुंभमेळ्यादरम्यान १ लाख
चाचणी अहवाल बनावट
उत्तराखंड आरोग्य विभागाने हरिद्धारमध्ये कुंभमेळ्यादरम्यान करण्यात आलेल्या चाचण्यांपैकी चार लाख चाचणी अहवाल (Test Report) बनावट असल्याचा संशय व्यक्त केला होता. यानंतर करण्यात आलेल्या तपासात एकूण १ लाख चाचणी अहवाल बनावट असून खासगी एनज्सीच्या सहाय्याने तयार करण्यात आल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. एजन्सीकडून नमुने गोळा करण्यासाठी जबाबदारी देण्यात आलेले २०० जण राजस्थानमधील विद्यार्थी आणि डेटा ऑपरेटर असल्याचंही समोर आलं आहे, जे कधीही हरिद्वारमध्ये आले नव्हते. एनज्सीला प्रत्येक अँटिजन टेस्टसाठी ३५० रुपये आणि आरटीपीसीआर टेस्टसाठी त्यापेक्षा जास्त पैसे दिले जात होते. त्यामुळे करोडोंचा घोटाळा असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
सरकारला अल्पदरात लसींचा
पुरवठा करता येणार नाही
फार काळ केंद्र सरकारला १५० रुपये प्रति डोस किमतीवर ‘कोव्हॅक्सिन’ लस देता येणार नाही असे लसींचे उत्पादन करणाऱ्या भारत बायोटेकने म्हटले आहे. कोव्हॅक्सिन ही करोनाविरुद्ध वापरात आलेली पहिली भारतीय लस आहे. केंद्राला दिलेल्या दरामुळे खासगी क्षेत्रात किंमत वाढत आहे असे कंपनीने निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे फार काळ केंद्र सरकारला अल्पदरात लसींचा पुरवठा करता येणार नाही असे भारत बायोटेकने म्हटले आहे.
लोकजनशक्ती पार्टीच्या अध्यक्षपदावरून
चिराग पासवान यांना हटवले
बिहारमध्ये सध्या लोकजनशक्ती पार्टीत जोरदार घडामोडी सुरू असल्याचे दिसत आहे. पक्षाच्या सहापैकी पाच खासदारांनी पक्षनेते चिराग पासवान यांच्याविरोधात बंड करून, त्यांचे काका पशूपती कुमार पारस यांची नेतेपदी निवड केली असून, आता चिराग पासवान यांना लोकजनशक्ती पार्टीच्या अध्यक्षपदावरूनही हटववण्यात आलं आहे. त्यामुळे चिराग पासवानसाठी या घडामोडी अतिशय धक्कादायक ठरत आहेत.
४३ टक्के भारतीयांनी कोणतीही
चिनी वस्तू खरेदी केलेली नाही
चीनला धडा शिकवण्याच्या’ ऊर्मीतून अनेक भारतीयांनी चिनी वस्तूंवर बंदी घालण्याची जोरदार मागणी केली होती. राष्ट्रीय स्तरावर चिनी अॅप्सवर बंदी घालण्यात आल्या नंतर नागरिकांनी चीनमध्ये निर्मिती करण्यात आलेल्या वस्तू न वापरण्याचा निर्णय घेतला होता. याचा परिणाम म्हणून एका वर्षात ४३ टक्के भारतीयांनी कोणतीही चिनी वस्तू खरेदी केलेली नाह अशी माहिती एका अहवालातून समोर आली आहे.
कोरोना विषाणूमुळे सुदृढ
युवकांमध्येही झटका येण्याचा धोका
कोरोना विषाणूमुळे आता सुदृढ युवकांमध्येही झटका (स्ट्रोक) येण्याचा धोका वाढला आहे. वयस्क लोकांना येणार्या गंभीर स्वरूपाच्या झटक्यांप्रमाणे ३० ते ४० वयोगटातील युवकांना झटके येत असल्याचे अमेरिकेच्या थॉमस जेफरसन विद्यापीठाच्या संशोधकांच्या संशोधनात आढळले आहे. विशेष म्हणजे कोरोनाबाधित होण्यापूर्वी या युवकांना झटक्यांचे कोणतेही लक्षणे दिसत नव्हते. मेंदूत रक्तपुरवठ्याला बाधा आल्यास किंवा मेंदूतील एखादी रक्तवाहिनी फुटून रक्तस्राव झाल्यास स्ट्रोक म्हणतात.
देशांतर्गत सोन्याचे
रोजचे दर घसरले
देशांतर्गत सराफा बाजारात सोन्याचे स्पॉट प्राइस म्हणजे सोन्याचे रोजचे दर रोजचे घसरले आहेत. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत सोन्याच्या किमतींमध्ये प्रति १० ग्रॅममध्ये ४६४ रुपयांची घट झाली. या घसरणीमुळे सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅमला ४७, ७०५ रुपयांवर आली आहे. विशेष म्हणजे मागील काही आठवड्यात सोन्याचे सोन्याच्या दराने ५० हजाराचा टप्पा पार केला होता. जागतिक किमतीत घसरण झाल्यामुळे सोन्याच्या देशांतर्गत किंमतीत ही मंदी आली आहे. सोन्याचे दर १० ग्रॅमला ४८, १६९ रुपये होते. सोन्यासह चांदीची देशांतर्गत किंमतही घसरली आहे.
राहुल द्रविड श्रीलंका दौर्यावर
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक
भारताचा दिग्गज आणि माजी कर्णधार राहुल द्रविड श्रीलंका दौर्यावर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक असणार आहे. बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने ही माहिती दिली. श्रीलंकेत होणाऱ्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी द्रविडची नेमणूक करण्यात आली आहे. त्याचवेळी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेच्या तयारीत व्यस्त असेल. द्रविड गेली अनेक वर्षे १९ वर्षांखालील भारतीय संघ आणि इंडिया ‘अ’ संघाला प्रशिक्षण देत आहे.
कंगनाच्या पासपोर्ट
नूतनीकरणावर आक्षेप
देशद्रोह प्रकरणी गुन्हा दाखल असल्याचा मुद्दा उपस्थित करत पासपोर्ट प्राधिकरणाने कंगनाच्या पासपोर्ट नूतनीकरणावर आक्षेप नोंदवल्यानंतर कंगना रनौत मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण, येथेही न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिला. पासपोर्टचा अवधी संपत असताना ऐनवेळी याचिका का दाखल केली? आता या याचिकेवर २५ जून रोजी सुनावणी होणार आहे. ‘धाकड’ या आपल्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी कंगनाला १५ जून ते ३० ऑगस्ट या काळात कंगनाला हंगेरीला रवाना होणार आहे. पासपोर्ट सप्टेंबर २०२१ पर्यंतच वैध असल्याने प्रवासात अडचणी येत असल्याचा दावा कंगनाने याचिकेत केला आहे.
मास्को शहरात आठवडाभर सुट्टी जाहीर
रशियामध्ये कोरोना संसर्गाचे रुग्ण वाढत असल्याने सरकारने विविध उपाययोजना जाहीर केल्या आहेत. त्यातच मास्कोच्या महापौरांनी शहरात कोणताही महोत्सव नसताना प्रथमच काम न करण्याचा सप्ताह म्हणजेच आठवडाभर सुट्टी जाहीर केली आहे. वास्तविक, मास्को शहरात नेहमी दरवर्षी सांस्कृतिक महोत्सवासाठी आठवडाभर सुट्टी जाहीर करण्यात येते.
महाराष्ट्रातून दोन नावं
कॅबिनेटमध्ये मंत्रिपदासाठी चर्चेत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा जोरदार सुरु झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासोबत शुक्रवारी बैठक घेतली होती. याशिवाय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही दोन दिवस दिल्लीत तळ ठोकला होता. अशा परिस्थितीत महाराष्ट्रातून दोन नावं कॅबिनेटमध्ये चर्चेत आहेत. भाजप खासदार नारायण राणे यांचं आणि बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांचं नाव आहे.
वारकऱ्यांना दीड किलोमीटर
पायी जाण्याची परवानगी
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यात निर्बंध लावण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर यंदाच्या आषाढी वारीसाठीही शासनाने नियमावली जाहीर केली आहे. यंदाच्या आषाढी वारीसाठी मानाच्या 10 पालख्यांना परवानगी देण्यात आली असून प्रस्थान ठिकाणापासून एसटी बसमधून वाखरीपर्यंत प्रवास करता येणार आहे. तर वाखरीपासून दीड किलोमीटर अंतर पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना पायी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.
SD social media
9850 60 3590