‘बर्थडे बॉय’ विराट कोहली ठरला शतकाधीश! ४९व्या वनडे शतकासह सचिनच्या विक्रमाशी केली बरोबरी
आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ स्पर्धेतील ३७व्या सामन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका आमनेसामने आहेत. दोन्ही संघातील हा सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक प्रथम फलंदाजी निर्णय घेतला होता. विराट कोहलीने या सामन्यात आपले ४९ वनडे शतक झळकावत सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबर केली. विराटने हे शतक ११९ चेंडूत १० चौकारांच्या मदतीने पूर्ण केले. त्याचबरोबर भारतीय संघाने ५० षटकांत ५ बाद ३२६ धावा केल्या आणि दक्षिण आफ्रिकेसमोर ३२७ धावांचे लक्ष्य ठेवले.विराट कोहलीने ११९ चेंडूत शतक झळकावले. हे त्याचे एकदिवसीय कारकिर्दीतील ४९ वे शतक होते. या बाबतीत त्याने महान फलंदाज आणि क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी केली. सचिनने वनडेमध्ये ४९ शतके झळकावली आहेत. सचिनने ४५२ एकदिवसीय डावात ही कामगिरी केली होती, तर विराट कोहलीने २७७ व्या एकदिवसीय डावात ४९ शतके झळकावली आहेत. यात विशेष म्हणजे आज वाढदिवसाच्या दिवशी त्याने शतक झळकावून विक्रमाची बरोबरी केली. या विश्वचषकातील त्याचे हे दुसरे शतक ठरले.
एकनाथ खडसेंच्या छातीत वेदना, मुख्यमंत्र्यांकडून एअर अॅम्बुलन्सची व्यवस्था
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार एकनाथ खडसे यांच्या छातीत दुखत असल्याचं समोर आलं आहे. यानंतर खडसेंना तातडीनं जळगावातील रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पुढील उपचारासाठी खडसेंना मुंबईत हलविण्यात येणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीनं एअर अॅम्बुलन्सची व्यवस्था केली आहे.
चंद्रपूर : संतापजनक..! सॅनिटरी पॅडची विल्हेवाट लावली नाही; मुख्याध्यापिकेने २३ विद्यार्थिनींना कोंडून ठेवले
सॅनिटरी पॅडची योग्य विल्हेवाट लावली नाही म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिकेने २३ विद्यार्थिनींना एक तास स्वच्छतागृहात बंद करून ठेवल्याचा धक्कदायक प्रकार उघडकीस आला आहे. स्वच्छतागृहातील दुर्गंधीमुळे दोन विद्यार्थिनी चक्कर येवून पडल्या तर काहींना उलटी, ओकाऱ्या झाल्या. या प्रकारामुळे शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.
ऐन दिवाळीत सदावर्तेंकडून एसटी बंदचा इशारा
सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी गुणरत्न सदावर्ते यांया नेतृत्त्वातील एसटी कष्टकरी जनसंघ या एसटी कामगार संघटनेने ऐन दिवाळीत संपाची हाक दिली आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत प्रवाशांचे हाल होणार आहेत. तसंच, त्यांनी मराठा आरक्षणाविरोधातही षड्डू ठोकला आहे. यामुळे ते सध्या बरेच चर्चेत आहेत. यावरून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यानी हल्लाबोल केला आहे. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
“२०२४च्या निवडणुकीआधी महिला आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देणे कठीण”; सुप्रीम कोर्टाचं निरीक्षण
केंद्र सरकारने अलीकडेच विशेष अधिवेशन बोलवून संसदेत महिला आरक्षण विधेयक मंजूर केलं आहे. लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभेत महिलांना ३३ टक्के जागा राखीव ठेवण्यात याव्यात, असा निर्णय घेण्यात आला आहे. देशाची जनगणना झाल्यानंतर हा कायदा लागू होणार आहे. पण संबंधित कायद्याची अंमलबजावणी २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका काँग्रेसच्या नेत्या डॉ. जया ठाकूर यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.संसद आणि राज्यांच्या विधानसभेत महिलांसाठी ३३ टक्के जागा राखीव ठेवण्यासाठी अलीकडेच मंजूर केलेला कायदा २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी लागू करण्यात यावा, अशी विनंती करणारी याचिका तातडीने ऐकण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि एसव्हीएन भट्टी यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी पार पडली.
“१९ नोव्हेंबरला विमान प्रवास करू नका, नाहीतर…”, वर्ल्डकप फायनलच्या दिवशी दिल्लीत घातपाताची खलिस्तान्यांची धमकी!
देशभरात सध्या क्रिकेट विश्वचषकाचा उत्साह पाहायला मिळत आहे. टीम इंडिया सेमीफायनलमध्ये पोहोचली असून फायनलमध्येही भारतीय संघानंच विजेतेपद पटकवावं अशी इच्छा प्रत्येक भारतीयाची आहे. पण त्याच दिवशी घातपात करण्याची धमकी कॅनडातील खलिस्तान्यांचा म्होरक्या गुरपतवंतसिंग पन्नूनं दिली आहे. एका व्हिडीओच्या माध्यमातून त्यानं ही धकमी दिली आहे. १९ नोव्हेंबरला शीख समुदायानं दिल्ली विमानतळावरून विमान प्रवास करू नये, असा इशाराही त्यानं दिला आहे.गुरपतवंतसिंग पन्नू हा खलिस्तानी दहशतवादी असून भारतीय सुरक्षा व्यवस्थेसाठी तो एक फरार गुन्हेगार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गुरपतवंतसिंग पन्नू व्हिडीओच्या माध्यमातून अशी गरळ ओकताना दिसत आहे. हरदीपसिंग निज्जर हत्या प्रकरणामुळे भारत व कॅनडामधील संबंध ताणले गेले असताना त्यासंदर्भातही गुरपतवंतसिंग पन्नूनं भावना भडकावणारी व भारतविरोधी विधानं केली होती.
मटका किंग रतन खत्रीच्या जीवनावर बेतलेला असणार नागराज मंजुळे यांचा पुढील चित्रपट
‘नाळ २’ या चित्रपटामुळे सध्या नागराज मंजुळे चर्चेत आहेत. काहीच महिन्यांपूर्वी ते ‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटातही झळकले. लेखन आणि दिग्दर्शनाबरोबरच नागराज सध्या अभिनयातही वेगवेगळे प्रयोग करताना दिसत आहेत. कायम हटके, वेगळे आणि डोक्याला खाद्य देणारे चित्रपट देणाऱ्या दिग्दर्शकांपैकी एक नागराज आहेत. आपल्या चित्रपटातून ते समाजाबद्दल, विषमतेबद्दल भाष्य करत असतात.नुकतंच नागराज यांनी ‘द लल्लनटॉप’च्या ‘गेस्ट इन अ न्यूजरूम’ या कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमात नागराज यांनी त्यांच्या चित्रपटांबद्दल तसेच एकूणच समाजातील विषमतेवरही भाष्य केलं. याबरोबरच नागराज यांनी त्यांच्या आगामी चित्रपटांबद्दलही काही खुलासे केले. छत्रपती शिवाजी महाराजांवरील नागराज यांचा चित्रपट चित्रपट चर्चेत आहे. याबरोबरच नागराज हे मटका किंग रतन खत्री यांच्यावरही चित्रपट काढणार आहेत.
लवकरच ‘व्हय मी सावित्रीबाई!’ नाटक इंग्रजीमध्ये येणार प्रेक्षकांच्या भेटीस; ‘सहकुटुंब सहपरिवार’ फेम अभिनेत्री झळकणार सावित्रीबाईंच्या भूमिकेत
स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे, समाजाला मानवतेचा व सत्याचा मार्ग दाखवणारे महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित ‘सत्यशोधक’ या चित्रपटाचा पोस्टर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. या चित्रपटात महात्मा फुलेंची भूमिका अभिनेता संदीप कुलकर्णी, तर राजश्री देशपांडे सावित्रीबाईंची भूमिका साकारणार आहेत. सावित्रीबाईंची जयंती ३ जानेवारी आहे, त्याचं औचित्य साधून ‘सत्यशोधक’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अशातच आता महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यावरील इंग्रजी नाटक देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आज मराठी रंगभूमी दिनानिमित्ताने या नाटकाची घोषणा करण्यात आली आहे.
SD Social Media
9850603590