सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर रिया चक्रवर्तीला अनेक ठिकाणी टीकेचा सामना करावा लागला. इतकंच नाही तर तुरूंगातून आल्यानंतर रियाच्या व्यावसायिक जीवनावरही याचा बराच परिणाम झाला. मात्र यादरम्यान रियाबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे.
द टाइम्सकडून 50 मोस्ट डिझायरेबल वुमन 2020 ची यादी समोर आली आहे. या यादीमध्ये अशा कलाकारांचा समावेश करण्यात आला होता, जो मागील वर्षी जास्त चर्चेत होता. ऑनलाईन वोटिंग झाल्यानंतर ही यादी समोर आली आहे.
विशेष म्हणजे रिया चक्रवर्ती या यादीमध्ये टॉपवर आहे. रियानं अनेक सेलिब्रिटींना मागे टाकत या यादीत अव्वल स्थान मिळवलं आहे. गेल्या वर्षी रिया सर्वाधिक चर्चेत होती. सुशांतच्या मृत्यूनंतर रियानं सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं होतं की ती सुशांतची गर्लफ्रेन्ड आहे आणि सीबीआयनं या प्रकरणाची चौकशी करावी.
या यादीमध्ये रियानं दीपिका पादुकोण आणि दिशा पटानी यांनाही मागं सोडलं आहे. तर या यादीत अॅडलिन कॅस्टेलिनो (मिस युनिव्हर्स 2020 ची थर्ड रनर अप) दुसर्या क्रमांकावर, दिशा पटानी तिसऱ्या क्रमांकावर, कियारा अडवाणी चौथ्या क्रमांकावर आणि दीपिका पादुकोण पाचव्या क्रमांकावर आहेत.
रियाच्या प्रोफेशनल आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर, सुशांतच्या मृत्यूपूर्वी तिनं ‘चेहरे’ चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं होतं. या चित्रपटात इमरान हाश्मी आणि अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट यावर्षी एप्रिलमध्ये प्रदर्शित होणार होता, मात्र कोरोना परिस्थितीमुळे या चित्रपटाची तारीख पुढे ढकलण्यात आली.
जेव्हा चित्रपटाचं पोस्टर्स आणि टीझर रिलीज झालं तेव्हा रिया चक्रवर्ती त्यात दिसली नाही. मात्र ट्रेलरमध्ये रियाची छोटीशी झलक पाहायला मिळाली तरी.
याशिवाय रियाकडे सध्या दुसरा कोणताही प्रोजेक्ट नाही. सध्या ती कुटुंबासोबत वेळ घालवत आहे.