भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय जीवन बीमा निगम (LIC) ने सरकारी बँक यूनियन बँक ऑफ इंडिया मध्ये गुंतवणूक केली आहे. LIC ने यूनियन बँक ऑफ इंडिया मधील शेअर्समधील टक्केवारी 2 टक्के वाढवली आहे. यानंतर यूनियन बँकेतील एलआयसीची टक्केवारी 5.06 टक्के झाली आहे. यापूर्वी LIC नं यूनियन बँकेतील शेअर्स 3.06 टक्के पर्यंत वाढवले होती.यूनियन बँकेच्या माध्यमातून एलआसीनं स्टॉक एक्सचेंजला माहिती दिली आहे. एलआयसीकडे यापूर्वी यूनियन बँकेतील 19 कोटी 79 लाख 23 हजार 251 इक्विटी शेअर्स होते.
एलआयसीनं यूनियन बँकेतील 2 टक्के शेअर्स विकत घेतल्यानंतर त्यांच्या शेअर्सची टक्केवारी 5.06 टक्के झाली आहे. एलआयसीनं शुक्रवारी यूनियन बँकेतील 14 कोटी 78 लाख 41 हजार 513 शेअर्स खरेदी केले. यामुळे एलआयसीकडे यूनियन बँकेतील 34 कोटी 57 लाख 64 हजार 764 शेअर्स आहेत.
यूनियन बँक ऑफ इंडियाने गुरुवारी क्वालिफाइड इंस्टीट्यूशनल प्लेसमेंट (QIP) द्वारे 1,447.17 कोटी रुपये उभारले. दरम्यान LIC देखील यावर्षी IPO आणणार आहे. कारण केंद्र सरकारच्या संरचनात्मक निर्गंतवणूक धोरण पूर्णत्वासं जावं म्हणून करण्यात येत आहे.
एलआयसी (LIC) ने आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये शेअर्स विक्रीतून 37,000 कोटी रुपयांचा फायदा कमावला आहे. एलआयसीची स्थापना झाल्यापासून एलआयसीनं सर्वाधिक पैसे शेअर्स विक्रीतून उभारले आहेत. आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये एलआयसीनं शेअर्स विक्रीतून 25,625 कोटी रुपयांचा नफा कमावला होता. 2020-21मध्ये एलआयसीनं 94,000 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले होते.
भारतीय जीवन विमा निगम हा भारतीय बाजारातील सर्वात मोठा गुंतवणूकदार आहे. एलआयसीकडे 34 लाख कोटी रुपयांची मालमत्ता आहे. एलआयसीचा मुख्य आर्थिक स्त्रोत शेअर्स विक्री, जीवन विमा पॉलिसी हा आहे.