नितीन गडकरी पंतप्रधान असायला हवं होते : नाना पटोले

देशभरात कोरोनामुळे कोट्यवधी लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्याचं सोयरसुतक नाही, नितीन गडकरी पंतप्रधान असायला हवं होतं, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत नाना पटोले यांनी खतांचे वाढलेले दर, चक्रीवादळाने झालेले नुकसान, कोरोना लसीकरण अशा विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.
नितीन गडकरी यांनी कोरोना लसीच्या वाढत्या मागणीवरुन दहा कंपन्यांना लसनिर्मितीची परवानगी देण्याचा सल्ला दिला होता. त्यावरुन नाना पटोले यांनी टोमणा लगावला. नाना पटोले म्हणाले, “मोदींसमोर नितीन गडकरींचं चालतं की नाही ठाऊक नाही, पण आम्हाला वाटतं की नितीन गडकरी हे पंतप्रधान असायला हवे होते. कोटी लोक देशात मरत आहेत, पण मोदींना सोयरसूतक नाही”

भाजपमध्ये मोदींना हटवून गडकरी यांना पंतप्रधान करायचं अशी चर्चा सुरू आहे. आम्हला आनंद आहे की महाराष्ट्राचा माणूस पंतप्रधान होतोय. मी नितीन गडकरी यांच्याविरोधात लढलो त्यावेळी त्यांनी भावी पंतप्रधान म्हणून मतं मागितली होती. म्हणून आनंद आहे, असंही नाना पटोले म्हणाले.

केंद्र सरकारने दुसऱ्या लाटेकडे लक्ष दिलं नाही. उलट कोरोना संपला असं सांगण्यात आलं. त्याचे परिणाम काय झाले हे आपण पाहिलं, असा घणाघात नाना पटोले यांनी केला. कोरोना माहामारीत लोकांचा जीव गेला, शेतकऱ्यांचं नुकसान झालं. शेतकरी देशोधडीला लागला आहे. शेतमाालाला दाम दुप्पट देऊ असं मोदी म्हणाले पण आज शेतकऱ्यांना वस्तूस्थिती समजली, असं नाना पटोले म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात दौरा करत आहेत. मात्र चक्रीवादळाने महाराष्ट्रातही नुकसान झालं आहे. त्यांनी महाराष्ट्रातही यायला पाहिजे होतं. प्रशासनावर ताण येऊ नये म्हणून त्यांची भूमिका असेल तर ती चांगली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कंट्रोलरुममधून परिस्थिती हाताळत आहेत. प्रशासनावर ताण नको म्हणून आम्हीही उशिरा बाहेर पडत आहोत, असं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.