मेक्सिकोची अँड्रिया मेझा मिस युनिव्हर्स 2020 ठरली

मेक्सिकोची अँड्रिया मेझा मिस युनिव्हर्स 2020 ठरली आहे. तिला माजी मिस युनिव्हर्स जोजिबिनी टूंजीनं क्राऊन घातला. फ्लोरिडामध्ये हा कार्यक्रम पार पडला. ब्राझीलची ज्युलिया गामा फर्स्ट रनरअप ठरली. भारताची अ‍ॅडलिन कॅस्टेलिनो थर्ड रनरअप ठरली.

अँड्रिया मेझा ही एक सॉफ्टवेअर अभियंता असून मिस युनिव्हर्स ठरणारी ती तिसरी मेक्सिकन महिला ठरली आहे. अँड्रिया मेझा लैंगिक असमानता आणि लैंगिक हिंसेबद्दल नेहमी बोलताना दिसते. एवढंच नाही तर या स्पर्धेदरम्यान तिनं अनेक मोठी विधानं केली आहेत. अँड्रिया मेझा 26 वर्षांची असून चिहुआहुआ या शहरात 13 ऑगस्टला तिचा जन्म झाला होता. अल्मा कार्मोना आणि सॅन्टियागो मेझा यांची ती मुलगी आहे.

भारताची अ‍ॅडलिन कॅस्टेलिनो

ही स्पर्धा फ्लोरिडातील हॉलीवूडमधील सेमिनोल हार्ड रॉक हॉटेल आणि कॅसिनो येथे आयोजित करण्यात आली होती. संपूर्ण जगातील सुंदर आणि प्रतिभावान महिलांनी या स्पर्धेत आपल्या देशाचं प्रतिनिधित्व केलं. अ‍ॅडलिन मूळची कुवेतची आहे. तिनं एका मुलाखतीत हा खुलासा केला होता. ती म्हणाली होती की स्वत: ला स्वावलंबी करण्याच्या उद्देशानं तिनं भारतात येण्याचं ठरवलं होतं. मिस युनिव्हर्स 2020 स्पर्धेपूर्वी अ‍ॅडलिननं मिस दिवा युनिव्हर्स 2020 चे विजेतेपद जिंकले आहे. तिचे पालक कर्नाटकचे आहेत.मिस युनिव्हर्ससारख्या स्टेजवर पोहचणं ही एक मोठी गोष्ट आहे. अ‍ॅडलिनलासुद्धा हे स्वप्नापेक्षा काही कमी वाटतं नव्हतं. एका मुलाखतीत तिनं हा उल्लेख केला.पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत अ‍ॅडलिन म्हणाली- ‘जेव्हा मी कुवेतमध्ये मोठी होत होते, तेव्हा तिथं काही संधी मिळाली नाही. मी नेहमीच मिस युनिव्हर्स प्लॅटफॉर्मकडे पाहात होते मात्र असा विचार केला नव्हता की माझ्यासारख्या मुलीला चांगलं बोलता येत नाही, तिच्या शरीरावर डाग आहेत, तिला या प्रतिष्ठेच्या टप्प्यावर आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल.’

अभिनयाच्या क्षेत्रात येण्याच्या प्रश्नावर अ‍ॅडलिन म्हणाली- ‘मी एक रोमांचकारी प्रेमळ मुलगी आहे, प्रत्येक प्रसंगी माझ्या व्यक्तिमत्त्वाचे प्रत्येक पैलू जाणून घेण्याचा मी प्रयत्न करेन’.

‘तर हो, मला अ‍ॅक्टिंगची ऑफर मिळाली तर मला काही हरकत नसेल मात्र मला व्यवसायात करिअर करायचं आहे कारण मी व्यवसाय पदवीधर आहे आणि मला यात आवड आहे. माझ्यासाठी भविष्यात काय आहे ते कळेलच.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.