अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा कोरोनामुळे मृत्यू

तिहार तुरुंगात शिक्षा भोगत असलेला कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नवी दिल्लीमधील ऑल इंडिया इंन्स्टीट्यूट ऑफ मेडिकल सर्व्हिसेस म्हणजेच एम्समध्ये उपचारादरम्यान राजनचा शुक्रवारी मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. २६ एप्रिलपासून राजनवर एम्समध्ये उपचार सुरु होते.

तिहारच्या तुरुंगामध्येच राजनला कोरोनाची लागण झाली आहे. त्याच्यावर सुरुवातीला तुरुंगातील रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. त्याची प्रकृती स्थिर आहे.लक्षणं दिसल्यानंतर छोटा राजनची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यात छोटा राजनला कोरोना झाल्याचं स्पष्ट झाल्याची माहिती तुरुंग प्रशासनाकडून सांगण्यात आलं होतं. राजन पॉझिटिव्ह आल्यानंतर तिथे तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांना होम क्वारंटाइन होण्यास सांगितलं आहे. मात्र उपचारादरम्यान राजनची प्रकृती खालावल्याने त्याला एम्समध्ये दाखल करण्यात आलेलं तिथेच त्याचा मृत्यू झाला.

एप्रिलच्या मध्यात तुरुंग क्रमांक दोनमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आल्यानंतर छोटा राजनमध्ये कोरोनाची लक्षणं दिसून आली. त्यानंतर त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामुळे या तुरुंगातील कैद्यांना वेगळं ठेवलं गेलं आहे, असं तुरुंग प्रशासने सांगितलं होतं.

मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयानं जानेवारी महिन्यात राजनला खंडणी प्रकरणी दोन वर्षांती शिक्षा सुनावली. पनवेलमधील बांधकाम व्यावसायिकाकडे २६ कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी त्याला ही शिक्षा सुनावण्यात आली होती. २०१५ सालच्या प्रकरणात ही शिक्षा सुनावण्यात आलेली. मुंबईतलं राजनविरोधातील हे खंडणीचं तिसरं प्रकरण होतं, ज्यात त्याला शिक्षा सुनावण्यात आलेली. यापूर्वी दिल्लीतील बनावट पासपोर्ट प्रकरणातही शिक्षा सुनावण्यात आली आहे. नोव्हेंबर २०१५ मध्ये राजनला इंडोनेशियामधील बालीतून भारतात आणण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.