पतीसाठी मॅरेथॉन धावल्या लता करे यांच्या पतीचे निधन

बारामती येथील 72 वर्षीय मॅरेथॉनपटु लता करे यांचे पती भगवान करे यांचे ( 5 मे ) कोरोनाने निधन झाले. लता करे 2013 मध्ये बारामती शहरातील मॅरेथॉन स्पर्धेत धावल्या होत्या. लता करे यांनी पहिल्यांदा पतीच्या हृदयविकारावरील उपचारासाठी अनवाणी धावत प्रथम क्रमांक मिळविला होता. त्यानंतर त्या चर्चेत आल्या होत्या. बारामतीमधील रुग्णालयात कोरोनाचे उपचार सुरु असताना त्यांच्या पतीचे निधन झाले. त्यामुळे पतीला वाचविण्यासाठीची करे यांची धाव आता कायमची थांबली आहे.

2013 मध्ये लता करे या पतीच्या हृदयविकारावरील उपचाराचे पैसे मिळविण्यासाठी मॅरेथॉनमध्ये कडाक्याच्या थंडीत अनवाणी धावल्या.पतीच्या उपचारासाठी वयाच्या ६४ व्या वर्षी धावणाऱ्या लता करे यांनी मिळविलेल्या विजयानंतर सर्वत्र कौतुक झाले त्यानंतर सलग तीन वर्ष त्यांनी वयाची तमा न बाळगता बारामती येथील आयोजित स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवित हॅट्रीक साधली. तिसऱ्या वर्षी त्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धावल्या होत्या..

हृदयविकारातून त्यांनी पतीला वाचविले, मात्र, कोरोनापासून त्यांना त्या वाचवू शकल्या नाही..

लता करे यांच्या तिन्ही मुलींचे विवाह झाल्यावर हे कुटुंब सुमारे 9 वर्षांपूर्वी बारामतीत वास्तव्यास आले आहे. बुलडाणा येथे उत्पन्नाचे साधन नसल्याने या कुटुंबाने बारामतीत स्थलांतरीत होण्याचा निर्णय घेतला.सध्या त्यांचा मुलगा एका कंपनीत चौकीदाराची नोकरी करतो. हे कुटुंब एका भाड्याच्या खोलीत वास्तव्यास आहे.

पतीसाठी अनवाणी धावत स्पर्धा जिंकणाऱ्या करे यांची आयुष्याच्या सत्तरीकडे वाटचाल करणाऱ्या वयातील जिद्द आणि यश पाहुन त्यांच्या जीवनावर चित्रपट देखील काढण्यात आला आहे. लता भगवान करे,एक संघर्षकथा’ असे या चित्रपटाचे नाव आहे.विशेष म्हणजे करे यांनीच त्यांची मुख्य भूमिका चित्रपटात साकारली होती. दक्षिणात्य निर्माते ए कृष्णा अरुबोधु यांनी या चित्रपटाची निर्मिती केली होती.तर नविन देशबोईना यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.त्यांच्या जीवनावर आधारीत मराठी चित्रपटास ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये विशेष पुरस्कार मार्च २०२१ मध्ये जाहीर झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.