दामदुप्पट परताव्याच्या आमिषाने ३६५ ठेवीदारांची फसवणूक; कलकम रियल इन्फ्रा इंडिया कंपनीतील प्रकार
दामदुप्पट परतावा देण्याचे आमीष दाखवून कलकम रियल इन्फ्रा (इंडिया) कंपनीकडून सोलापुरात ३६५ ठेवीदारांची आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार उजेडात आला आहे. फसवणुकीची रक्कम एक कोटी ३२ हजार ८५७ रूपयांची असून प्रत्यक्षात त्यात वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यासंदर्भात दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास फौजदार चावडी पोलीस करीत आहेत.
“अजित पवार गटाच्या २० हजार प्रतिज्ञापत्रांत त्रुटी”, EC मधील सुनावणी संपल्यानंतर शरद पवार गटाच्या वकिलांचा दावा
राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फुटल्याने राजकीय भूकंप झाले. परिणामी ही दोन्ही प्रकरणं निवडणूक आयोग आणि मग सर्वोच्च न्यायालयात गेले. सध्या राष्ट्रवादी पक्षनाव आणि पक्षचिन्हाचा तिढा निवडणूक आयोगात आहे. अजित पवार गटाने पक्षावर दावा करत निवडणूक आयोगात याचिका केली होती. याप्रकरणी सुनावणी सुरू असून आज (९ नोव्हेंबर) शरद पवार गटाने बाजू मांडली. शरद पवार गटाकडून ज्येष्ठ वकिल अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तीवाद केला. तर, सुनावणी वेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. सुनावणी संपल्यानंतर अभिषेक मनु सिंघवी यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.
ऊस दर प्रश्नावरून राजू शेट्टी यांची लोकसभा निवडणुकीची पेरणी
ऊस दरासाठी ५०० किलोमीटर अंतराची आक्रोश पदयात्रेची सांगता ऊस परिषदेमध्ये केल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे चालू गळीत हंगामाच्या दराची मागणी करून आंदोलनाला विसावा देतील असे वाटत होते. पण त्यांनी जयसिंगपूरच्या मुख्य मार्गावर ऐन दिवाळीत १६ नोव्हेंबरपर्यंत ठिय्या आंदोलन आरंभले आहे. ऊस संघर्षाला धार वाढवण्यासाठी हे आंदोलन होत असले तरी त्यातून आगामी लोकसभा निवडणुकीची पेरणी होत असल्याचे काही लपलेले नाही. ऊस दराचे अर्थकारण जुळता जुळत नसल्याने पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि राजू शेट्टी यांच्यातील पत्रक युद्धाची फटकेबाजी रंगात आली आहे.
इस्रायलकडून हमासच्या मिसाईल मॅनचा खात्मा
इस्रायल सैन्याने केलेल्या हवाई हल्ल्यात हमासच्या अँटी टँक मिसाईल युनिटच्या प्रमुखाचा खात्मा केला. इब्राहिम अबू मघसिब असं हमासच्या सेंट्रल कॅम्प ब्रिगेडमधील प्रमुखाचं नाव आहे. त्याला हमासचा मिसाईल मॅन म्हणूनही ओळखलं जात होतं.
इब्राहिम अबू मघसिबने याआधी इस्रायलवर अनेक क्षेपणास्त्र हल्ल्यांचं नेतृत्व केलं होतं. दरम्यान, इस्रायलच्या सैन्याने जमिनीवरून हमासवर हल्ले चढवलेच. याशिवाय इस्रायच्या नौदलाने हमासच्या अँटी टँक मिसाईल पोस्टही उद्ध्वस्त केल्या.
बिहार विधानसभेत ६५ टक्के आरक्षणाचं विधेयक बिनविरोध मंजूर
बिहारमधील नितीश कुमार सरकारने गुरुवारी विधानसभेत आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा प्रस्ताव मांडला. या विधेयकानुसार बिहारमध्ये मागासवर्गीय, अत्यंत मागासवर्गीय, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी ६५ टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. सध्या या वर्गांना बिहारमध्ये ५० टक्के आरक्षण आहे. नितीश कुमार यांनी अलिकडेच राज्यात जातीनिहाय जनगणना करून त्याचा अहवाल सादर केला होता. या अहवालाचा आधार घेत त्यांनी आता आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आज त्यांनी आरक्षणाची मर्यादा वाढवणारं विधेयक विधानसभेत मांडलं, जे बिनविरोध मंजूर करण्यात आलं आहे.
व्यावसायिक कोळसा खाणी लिलाव पूर्णपणे पारदर्शक
वर्ष २०१४ मध्ये २०४ कोळसा खाणी रद्द केल्यानंतर कोळसा खाणींचा लिलाव पारदर्शक यंत्रणेद्वारे आणि ऊर्जा आणि नियमन नसलेल्या क्षेत्रांसारख्या विविध वापरकर्त्यांसाठी केला जात असल्याचे कोळसा मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. बंदिस्त कोळसा खाणींसाठी लिलाव आधारित व्यवस्था फलद्रूप झाल्यामुळे आणि देशाच्या उत्पादनाला चालना देण्याच्या आणि कोळशाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याच्या उद्देशाने २०२० मध्ये व्यावसायिक खाणकामासाठी सांगोपांग विचार करून भविष्यकालीन धोरण आणले गेले. या धोरणांतर्गत व्यावसायिक कोळसा खाणकामाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आणि त्वरित निर्णय प्रक्रियेसाठी सचिव (परराष्ट्र व्यवहार विभाग), सचिव (कायदेशीर व्यवहार विभाग), सचिव (पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय) आणि सचिव (कोळसा) यांचा सदस्य म्हणून समावेश असलेली सचिवांची अधिकार प्राप्त समिती (ईसीओएस) स्थापन करण्यात आली.
मिरे अॅसेट म्युच्युअल फंडाकडून यूपीआय आधारित ऑटो पे सुविधेला सुरुवात
भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या फंड घराण्यांपैकी एक असलेल्या मिरे अॅसेट म्युच्युअल फंडाने एसआयपी नोंदणीकृत ग्राहकांसाठी यूपीआय ऑटोपे सुविधेचा प्रारंभ करत असल्याची आज महत्त्वपूर्ण घोषणा केली. मिरे अॅसेट म्युच्युअल फंड, केफिनटेक आणि बिलडेस्कद्वारे वित्तीय क्षेत्रातील यूपीआय ऑटोपे हा संयुक्तपणे विकसित केलेला उपक्रम आहे. या उपक्रमामुळे मिरे अॅसेट म्युच्युअल फंडाच्या गुंतवणूकदारांना यूपीआय ऑटोपे वैशिष्टांचा वापर करून आपल्या एसआयपीची नोंदणी करण्यास मदत होते आणि त्यामुळे गुंतवणुकीसाठी लागणाऱ्या वेळेत बचत होऊन गुंतवणूक प्रक्रिया आणखी सुलभ व सहजसोपी झाली आहे. नवीन उपक्रमामुळे गुंतवणूकदारांना गुंतवणुकीचा परिपूर्ण अनुभव मिळत आहे.
SD Social Media
9850 60 3590