ChatGpt चे निर्माते सॅम ऑल्टमन यांनी घेतलेल्या भेटीनंतर पंतप्रधान मोदींनी केले ट्वीट
OpenAI ने गेल्या वर्षी नोहेंबर २०२२ मध्ये ChatGpt लॉन्च केले होते. ओपनएआयचे सीईओ आणि चॅटजीपीटीचे निर्माते सॅम ऑल्टमन हे दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. सॅम ऑल्टमन यांनी आपल्या भारत भेटीतील दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. सॅम ऑल्टमन यांनी या भेटीचा फोटो ट्विट केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विट करत सॅम ऑल्टमन यांना धन्यवाद दिले आहेत.ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन हे गेले काही दिवसांपासून भारतामध्ये आहेत. त्यांनी आपल्या भेटीच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. तसेच G20 शेर्पा आणि नीती आयोगाचे माजी सीईओ अमिताभ कांत यांची देखील भेट घेतली आहे. आयआयटी दिल्लीमधील एका कार्यक्रमात भाग घेऊन तेथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. याबाबतचे वृत्त बिझनेस टूडेने दिले आहे.
शरद पवारांना आलेल्या धमकीनंतर राष्ट्रवादीचा मुनगंटीवार, राणे-पडळकरांवर गंभीर आरोप
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यानंतर राज्यभर एकच खळबळ उडाली. “तुमचा दाभोळकर होणार,” असं ट्वीट करत ही धमकी देण्यात आली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेत याबाबत तक्रार दाखल केली. त्यावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. या प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपा नेत्यांवर संशय व्यक्त केला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले की, शरद पवार साहेबांची खूप मोठी राजकीय कारकीर्द आहे. इतक्या वर्षांमध्ये त्यांना अशा धमक्या येणं हा काही त्यांच्यासाठी नवीन प्रकार नाही. ते इतकी वर्ष राजकारणात आहेत, अशा धमक्यांना ते भिक घालत नाहीत, आणि मुळीच घाबरत नाहीत.
भगवंत मान यांना नवज्योत सिंग सिद्धू यांच्यामुळेच मुख्यमंत्रीपद मिळाले; सिद्धू यांच्या पत्नीचा दावा
काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नी नवज्योत कौर सिद्धू यांनी केलेल्या एका विधानामुळे पंजाबमध्ये राजकीय वाद सुरू झाला आहे. नवज्योत कौर म्हणाल्या की, भगवंत मान यांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची नवज्योत सिंग सिद्धू यांनी भेट दिली. नवज्योत सिंग सिद्धू यांनी पंजाबचे नेतृत्व करावे, अशी आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची इच्छा होती. पण नवज्योत सिंग सिद्धू यांनी आपल्या पक्षाशी प्रामाणिक राहण्याचा निर्णय घेतला. नवज्योत कौर यांच्या वक्तव्यामुळे आता भगवंत मान आणि नवज्योत सिंग सिद्धू यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे.
मराठमोळ्या जोडीनं भारताची शान राखली! रहाणे-शार्दुलचे दमदार अर्धशतक, भारताचा पहिला डाव २९६ धावांवर संपुष्टात
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनलचा सामना लंडनच्या ओव्हल मैदानात रंगत आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मैदानात फलंदाजीसाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियाने सर्वबाद ४६९ धावांपर्यंत मजल मारली. स्टीव्ह स्मिथ आणि ट्रेविस हेडच्या शानदार शतकामुळे ऑस्ट्रेलियाने धावांचा डोंगर रचला. परंतु, या धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली होती. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४६९ धावा केल्यानंतर दुसऱ्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत भारताने १५१ धावांवर पाच विकेट्स गमावल्या होत्या.त्यानंतर आजच्या दिवशी भारताचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे आणि शार्दुल ठाकूरने अप्रतिम फलंदाजी करून भारताची शान राखली. रहाणेनं १२९ चेंडूत ८९ धावा केल्या. तसंच शार्दुल ठाकूरनेही अर्धशतकी खेळी करत ५१ धावांची खेळी केली. रविंद्र जेडजानेही ४८ धावांची खेळी करून भारताच्या धावसंख्येचा आलेख चढता ठेवला. या धावांच्या जोरावर भारताने ६९.४ षटकात सर्वबाद २९६ धावा केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने १७३ धावांची आघाडी घेतली आहे.
पुणेकर कधीच हार मानत नाही! वयाच्या 59 व्या वर्षी दिली दहावीची परीक्षा
आयुष्यात शिक्षणाचा महत्वाचा टप्पा म्हणून दहावीच्या परीक्षेकडे पाहिले जाते. मात्र, अनेकांना कुठल्या ना कुठल्या कारणावरून शिक्षणापासून वंचित रहावे लागते. अनेक जणांवर कमी वयातच कुटुंब चालवण्याची जबाबदारी येऊन पडते. त्यामुळे अनेकांना मधूनच शिक्षण सोडून द्यावे लागते. मात्र, वय वाढत असतानाही शिकण्याची ओढ काही जणांना स्वस्थ बसू देत नाही. या ओढीतूनच पुण्यातील एका 59 वर्षीय महिलेने आपली दहावी पूर्ण केली आहे.शीतल अमराळे यांना नुकत्याच लागलेल्या दहावीच्या निकालामध्ये 50 टक्के गुण मिळाले आहेत. सेवा सदन हायस्कूल पुणे या शाळेत शीतल या दहावीचे धडे गिरवत होत्या. बरेच वर्ष शिकण्याची इच्छा होती. परंतु वेळेअभावी आणि ज्वेलरी व्यवसाय सुरू असल्याने शिक्षण करता आले नाही. लहानपणी परिस्थिती हालाखीची होती त्यामुळे शिक्षण घेतानाही आलं नाही. सेवा सदन शाळेतील शिक्षकांनी खूप सहकार्य केले. काहीही अडचण आली तरीही त्यात मदत केली, असे शीतल अमराळे यांनी सांगितले.
काँग्रेसनेही भाकरी फिरवली, मुंबई अध्यक्षपदावरून भाई जगताप यांची उचलबांगडी, नव्या चेहऱ्याला संधी
ऐन निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसकडून मोठे बदल करण्यात आले आहेत. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून भाई जगताप यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. भाई जगताप यांच्याजागी वर्षा गायकवाड यांची मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस महासचिव केसी वेणुगोपाल यांनी याबाबतची घोषणा केली आहे. भाई जगताप यांची मुंबई अध्यक्षपदावरून उचलबांगडी का करण्यात आली? याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. मुंबईसोबतच काँग्रेसने गुजरात आणि पुदुच्चेरीच्या प्रदेशाध्यक्षांनाही डच्चू देत नव्या नेत्यांना संधी दिली आहे.
अजिंक्य रहाणेच टेस्ट क्रिकेटमध्ये जबरदस्त कमबॅक, नावावर केला मोठा विक्रम
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल सामना खेळवला जात आहे. लंडन येथील ओव्हल मैदानावर हा सामना सुरु असून यात भारताचे धुरंदर फलंदाज फेल ठरले असताना तब्बल दीड वर्षांनी टीम इंडियात कमबॅक केलेलया अजिंक्य रहाणेने जबरदस्त कामगिरी केली आहे. याकामगिरीनंतर अजिंक्य रहाणेच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद करण्यात आली आहे.अजिंक्य रहाणेने सय्यमी खेळी करत मैदानात फटकेबाजी सुरूच ठेवली तर शार्दूल ठाकूरने देखील अजिंक्यला साथ देत अर्धशतक पूर्ण केले. अजिंक्य रहाणेने देखील तिसऱ्या दिवशी टेस्ट क्रिकेटमधील 26 वे अर्धशतकं ठोकले आणि 5 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. अजिंक्य रहाणे टेस्ट क्रिकेटमध्ये 5020 धावा करून अशी कामगिरी करणारा 13 वा भारतीय ठरला आहे. मात्र शतक ठोकण्यासाठी केवळ 10 धावांची आवश्यकता असताना रहाणेची विकेट गेली.
SD Social Media
9850 60 3590