मान्सून केरळमध्ये, महाराष्ट्रात मात्र अजूनही घामाच्या धारा
राज्याच्या किनारपट्टी भागांवरून घोंगावणारे वादळ पुढे सरकत असतानाच विदर्भात मात्र तापमानाचा पारा पुन्हा एकदा वाढत चालला आहे. विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तापमान ४३ अंशाच्याही पलीकडे गेले आहे. आता केरळमध्ये मान्सूनची घोषणा हवामान खात्याने केल्यानंतर महाराष्ट्रालाही पावसाचे वेध लागले आहेत.
भाजपा २०२४ मध्ये विद्यमान खासदारांचे तिकीट कापणार?
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मोठा पराभव सहन करावा लागल्यानंतर कर्नाटक भाजपा संघटनेत मोठा असंतोष पाहायला मिळत आहे. पुढील वर्षी एप्रिल-मे दरम्यान होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून पक्षात आतापासूनच उघड वाद होऊ लागले आहेत. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि उत्तर बंगळुरुचे खासदार डीव्ही सदानंद गौडा यांनी आरोप केला आहे की, पक्षातील काही नेते त्यांचे तिकीट कापण्यासाठी षडयंत्र आखत आहेत. मागच्या सोमवारी, हेवरी-गडाग येथून तीन टर्म खासदार राहिलेले शिवकुमार उदासी यांनी वैयक्तिक कारणांसाठी राजकीय निवृत्ती जाहीर केली. मी पुढीलवर्षी होणारी निवडणूक लढविणार नाही, अशी माहिती राज्यातील पक्षाच्या नेत्यांना दिली आहे, अशी प्रतिक्रिया उदासी यांनी दिली होती.
मॉर्निंग वॉकला गेले ते परत आलेच नाही, ज्येष्ठ पत्रकार अरुण फणशीकर यांचा मृत्यू
नागपूरमधील ज्येष्ठ पत्रकार अरुण फणशीकर यांचा संशयास्पदरित्या मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. फणशीकर यांचा मृतदेह घरातील विहिरीत आढळून आला आहे. पोटाला दगड बांधलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळला आहे. त्यामुळे आत्महत्या आहे की घातपात आहे, याबद्दल पोलीस अधिक तपास करत आहे.
विखेंना पक्षातूनच मोठा धक्का! थोरातांसोबत भाजपचा कोल्हे गट! पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर
अहमदनगर जिल्ह्यात राधाकृष्ण विखे पाटील यांची सत्ता असलेल्या गणेशनगर सहकारी साखर कारखान्याची यंदा निवडणूक चुरशीची होणार आहे. कारण, विखे यांना माजी मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी आव्हान दिले आहे. शिवाय कोपरगाव येथील भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे गटाने विखेंविरोधात थोरातांना साथ देण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे आता महसूलमंत्री राधाकृष्ण पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.
ममता बॅनर्जींनी जपली १२ वर्षांची परंपरा, पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना पाठवली ‘ही’ खास भेट
राजकीय पटलावर एकमेकांचे कडवे विरोधक असतानाही पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या १२ वर्षांची परंपरा जपली आहे. ममता बॅनर्जी दरवर्षी देशाच्या पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना आंब्याची पेटी पाठवतात. त्यानिमित्ताने यंदाही त्यांनी परंपरा जपत आंब्यांच्या पेट्या पाठवल्या आहेत. मंगळवारी या पेट्या पाठवण्यात आल्या असून येत्या एक ते दोन दिवसात ते मोदींच्या निवासस्थानी पोहोचण्याची शक्यता आहे.
स्टीव्ह स्मिथ- ट्रेविस हेडची शानदार शतकं! पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने सर्वबाद ४६९ धावांवर मारली मजल
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनलचा सामना लंडनच्या ओव्हल मैदानात सुरु आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पहिल्याच दिवशी भारताने चांगली सुरुवात केली होती. मोहम्मद सिराजने उस्मान ख्वाजाला शून्यावर बाद करत ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला होता. त्यानंतर शार्दूल ठाकूरने डेव्हिड वॉर्नरला (४३) तर मोहम्मद शमीने मार्कस लाबुशेनला (२६) धावांवर बाद केलं. परंतु, त्यानंतर ट्रेविस हेड आणि स्टीव्ह स्मिथने शानदार शतक झळकावत ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येचा आलेख चढता ठेवला.परंतु, आजच्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी कमाल केली. ऑस्ट्रेलियाचे धाकड फलंदाज स्मिथ (१२१) आणि हेडला (१६३) धावांवर बाद करून भारताने या इनिंगमध्ये कमबॅक केलं. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यामुळं ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ४६९ धावांवर गडगडला. ऑस्ट्रेलियाने १२१. ३ षटकात सर्वबाद ४६९ धावांवर मजल मारली.
SD Social Media
9850 60 3590