इंदुरचे प्रसिद्ध पोहे मुंबईत
मुंबईचे नाव घेतले की, आपल्या डोळ्यासमोर येते ते म्हणजे गर्दी, कायम भरलेली ट्रेन आणि मुंबईत मिळणारे खाण्याचे वेगवेगळे पदार्थ. मुंबईमध्ये कधीच कोणी उपाशी राहात नाही असं म्हणतात. इथं येणारा प्रत्येक माणूस आपलं पोट भरण्यासाठी काही ना काहीतरी करतच असतो. मुळचे इंदूरचे असलेले मात्र कामानिमित्त मुंबईत वास्तव्यात असलेले दिनेश पवार यांनी मुंबईत नुकताच इंदुरी चाट व्यवसाय सुरू केला आहे. जो अगदी कमी कालावधीमध्ये फेमस झाला आहे. आज (7 जून) आंतरराष्ट्रीय पोहे दिन आहे.मध्य प्रदेशातील इंदूर हे शहर तेथील खाद्यपदार्थांसाठी फेमस आहे. विशेषत: येथील पोहे आणि जिलेबी हे पदार्थ संपूर्ण देशभरात प्रसिद्ध आहेत. अनेक पर्यटक या फेमस पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी इंदूरला जात असतात. आता मुंबईकरांना या पदार्थांची अस्सल चव आपल्याच शहरात चाखायला मिळणार आहे.
दिनेश पवार यांनी थ्रीडी ॲनिमेशन या क्षेत्रात शिक्षण घेऊन अनेक कंपन्यांमध्ये कामही केलंय. स्वतःचा काहीतरी व्यवसाय करावा अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी पत्नीच्या मदतीनं माटुंग्यात इंदुरी पदार्थांचा स्टॉल सुरू केला. त्यांच्या या स्टॉलवर इंदुरी चाट, दही टिक्की चाट, इंदुरी पोहे, दही भल्ला, दही भेल, समोसा चाट, निंबु शिकंजी, लस्सी, छास हे पदार्थ मिळतात. हा संपूर्ण परिसर शाळा आणि कॉलेजचा आहे. त्यामुळे येथील बहुतेक पदार्थांचे दर हे तरूणाईला परवडतील असे 30 ते 60 रुपयांच्या दरम्यान आहेत.
दोन दिवसांत मॉन्सूनचे केरळात आगमन
हवामान खात्याने येत्या दोन दिवसांत माॅन्सून केरळमध्ये दाखल होऊ शकतो, अशी नांदी बुधवारी दूपारच्या सुमारास दिली. त्यामुळे पावसाच्या प्रतिक्षेत असणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. केरळमध्ये माॅन्सूनच्या प्रवेशाबाबत सर्व परिस्थिती अनुकूल असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.‘बिपरजॉय’ चक्रीवादळ माॅन्सूनची वाट अडवत असल्याचे दिसून येत असताना हवामान खात्याने येत्या दोन दिवसांत मॉन्सूनच्या केरळमधील आगमनाची शक्यता वर्तवली. हवामान खात्याने सांगितले की, अरबी समुद्र, लक्षद्वीप, केरळ किनाऱ्यावरील ढगाळ वातावरणात वाढ झाली आहे. त्यामुळे पुढील ४८ तासांत केरळमध्ये मॉन्सून सक्रीय होण्याची परिस्थिती अनुकूल आहे. केरळ किनारपट्टीवरील अनेक भागांमध्ये गेल्या २४ तासांत पावसाने हजेरी लावली असून अनेक भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला आहे. नैऋत्य माॅन्सून साधारणपणे एक जूनला केरळमध्ये दाखल होतो. यापूर्वी हवामान खात्याने चार जूनपर्यंत माॅन्सून दाखल होणार असल्याचे सांगितले होते.
“WFI चं अध्यक्षपद महिलेला द्या आणि…” आंदोलन करणाऱ्या कुस्तीगीरांनी सरकारसमोर ठेवल्या पाच मागण्या
मागच्या ३५ दिवसांहून अधिक काळ आंदोलन करत असलेल्या कुस्तीगीरांनी आता आपल्या पाच मागण्या सरकारसमोर ठेवल्या आहेत. अखिल भारतीय कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात हे आंदोलन करण्यात येतं आहे. बृजभूषण सिंह यांनी महिला कुस्तीगीरांचं लैंगिक शोषण केल्याची तक्रार त्यांच्याविरोधात आहे. क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या निवासस्थानी जाऊन कुस्तीगीरांनी त्यांची भेट घेतली. त्यानंतर कुस्तीगीरांनी आपल्या पाच मागण्या त्यांच्यासमोर ठेवल्या आहेत.बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांनी बुधवारी क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्याशी चर्चा केली. अनुराग ठाकूर यांनी उशिरा ट्वीट करत कुस्तीगीरांना चर्चेसाठी या म्हणून बोलावलं होतं. त्यानंतर हे दोन कुस्तीगीर चर्चेसाठी गेले होते.
चीन सरकारने पंचेन लामांची तत्काळ सुटका करावी; इंडो-तिबेट फ्रेंडशिप असोसिएशनच्या बैठकीत मागणी
दलाई लामा यांच्यानंतर तिबेटचे दुसरे सर्वोच्च धर्मगुरू ११ वे पंचेन लामा यांची चीनने तत्काळ सुटका करावी आणि मानसरोवर यात्रेवरील शुल्क व बंदी हटवावी, अशी मागणी भारत-तिबेट मैत्री असोसिएशनने केली आहे. प्रदेशाध्यक्ष अमृत बनसोड यांच्या सूचनेवरून झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दलाई लामा यांनी १४ मे १९ रोजी तिबेटचे अकरावे पंचेन लामा घोषित केल्यानंतर अवघ्या तीन दिवसांनी १७ मे रोजी चीनने सहा वर्षीय धुन चोक्या निमा आणि त्यांच्या कुटुंबाला राजकीय कैदी म्हणून अटक केली. तरीही चीन सरकार ही माहिती सार्वजनिक करत नाहीये. ते कुठे आहेत आणि कसे आहेत. चीन सरकारने याबाबत पूर्ण गोपनीयता पाळली आहे. अकरावे पंचेन लामा, दशकातील सर्वात तरुण राजकीय कैदी असून आता ते ३४ वर्षांचे झाले आहेत. ते २७ वर्षांपासून चीनच्या ताब्यात आहेत. त्यांना सोडविण्यासाठीच्या या अभियानांतर्गत भंडारा शाखेतून पंतप्रधानांना जास्तीत जास्त पोस्टकार्ड पाठवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
लग्नाचा खेळ मांडला! नवरीनं 20 जणांना गुंडाळलं, 6 जणांना ठोकल्या बेड्या
जुन्नर तालुक्यातील गुंजाळवाडी व खोडद येथील शेतकरी कुटुंबातील दोन तरुणांबरोबर दीड महिन्यात एकाच मुलीचा नाव बदलून विवाह लावून दागिणे रोख रक्कम असा सुमारे साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल घेऊन पसार झालेल्या टोळीतील बनावट नवरी मुलीसह 6 जणांच्या टोळीला नारायणगाव पोलिसांनी मोठ्या शिताफिने अटक करून जेरबंद केले आहे.परिसरात या टोळीने 20 पेक्षा जास्त मुलांना अशाच पद्धतीने गंडा घातल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी बनावट नवरी जयश्री काळू घोटाळे बनावट मावशी मीरा बन्सी विसलकर (वय-39), तुकाराम भाऊराव मांगते (वय-23, दोघेही राहणार अंबुजा वाडी, इगतपुरी घोटी, जिल्हा नाशिक), बाळू भिकाजी काळे (वय- 46 राहणार बोटा, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर), एजंट शिवाजी शंकर कुरकुटे( वय 64, राहणार- कुरकुटेवाडी, बोटा, तालुका संगमनेर जिल्हा नगर), बाळू गुलाब सरवदे (वय 41,राहणार गुंजाळवाडी, तालुका जुन्नर जिल्हा पुणे) या आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
कोल्हापूर दंगलीबाबत माजी गृहमंत्र्यांचे सत्ताधारी पक्षावर गंभीर आरोप
संगमनेर आणि कोल्हापूर येथे झालेल्या दंगलीबाबत राष्ट्रवादी भाजपाविरोधात आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी सत्ताधारी दंगलीला प्रोत्साहन देत आहे, असा आरोप केला. आता माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावर भाष्य केले आहे.
मंदीचे सावट अजूनही कायम; आता Reddit कंपनी करणार कर्मचाऱ्यांची कपात
सध्या जगभरामध्ये अनेक जागतिक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांची कपात करत आहेत. जागतिक आर्थिक मंदीचे कारण देत ही कर्मचारी कपात करण्यात येत आहे. आता पर्यंत Meta, Twitter, Amazonसह अनेक कंपन्यांनी कपात केली आहे. आता Reddit या कंपनीने देखील कर्मचारी कपात केली आहे.सोशल प्लॅटफॉर्म असणाऱ्या Reddit कंपनीने आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी ५ टक्के म्हणजे ९० कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. यामुळे आता अमेरिकेतील कर्मचाऱ्यांची कपात करणाऱ्या कंपन्यांच्या यादीमध्ये Reddit चा समावेश झाला आहे. मेटा प्लॅटफॉर्मसह अनेक टेक कंपन्या महामारीच्या काळामध्ये नोकरीवर घेतल्यावर आता नोकऱ्यांची कपात करत आहेत. कारण आर्थिक मंदीचा सामना करण्याचा त्या प्रयत्न करत आहेत. याबाबतचे वृत्त moneycontrol ने दिले आहे.
तब्बल २० लाखांपेक्षा अधिक कुटुंबांना मिळणार मोफत इंटरनेट सेवा
देशामध्ये जिओ, एअरटेल आणि वोडाफोन-आयडिया या प्रमुख टेलिकॉम कंपन्या आहेत. ज्याचा वापर नागरिक इंटरनेट वापरण्यासाठी करतात. आजकाल इंटरनेट हे प्रत्येक माणसाच्या आयुष्याचा महत्वाचा भाग बनले आहे. आपली बरीचशी कामे इंटरनेटच्या माध्यमातूनच केली जातात. आता इंटरनेटबाबत एक महत्वाची बातमी समोर येत आहे.केरळ सरकारने इंटरनेटबाबत एक घोषणा केली आहे. केरळ सरकार दारिद्र्यरेषेखाली (BPL )असणाऱ्या २० लाखांपेक्षा अधिक कुटुंबाना मोफत इंटरनेट सेवा देण्याच्या दृष्टीने राज्यभरामध्ये केरळ फायबर ऑप्टिक नेटवर्क (KFON) सुरू केले आहे. KFON ची अधिकृत घोषणा झाल्यामुळे प्रकल्प प्रत्यक्षात उतरला आहे. रिपोर्टनुसार,७ हजार कटुंबाना मोफत इंटरनेटची सुविधा मिळाली आहे. राज्यामध्ये इंटरनेट हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असल्याची घोषणा सत्ताधारी पक्षाने केली आहे.
सामन्याच्या पहिल्याच दिवशी सिराज-लाबुशेन भिडले!
लंडनमध्ये ओव्हल येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मोहम्मद सिराजने टीम इंडियाला चांगली सुरुवात करून दिली. त्याने उस्मान ख्वाजाला बाद केले. याआधीही तो कांगारू संघासाठी सतत डोकेदुखी ठरला. सिराजच्या षटकातील एक चेंडू इतका धोकादायक होता की मार्नस लाबुशेन जखमी झाला, त्याच्या हातातून बॅट खाली पडली होती.वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने टीम इंडियाला चांगली सुरुवात करून दिली. कांगारू फलंदाज उस्मान ख्वाजाला बाद करून सिराजला पहिले यश मिळाले. ख्वाजा खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर लाबुशेन आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यात अर्धशतकी भागीदारी झाली. पहिली विकेट पडल्यानंतर ऑस्ट्रेलियाकडून मार्नस लाबुशेन फलंदाजीला आला. त्याच्याशी सिराज भिडला त्यांच्यात शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. सिराज बॅट्समनला त्याच्या गोलंदाजी व्यतिरिक्त देखील इतर एका गोष्टीने सतत काही ना काही फलंदाजाच एकग्रता भंग करत असतो. तो स्लेजिंग आणि स्टॅरिंग करून फलंदाजाला नेहमीच सेट होऊ देत नाही.
SD Social Media
9850 60 3590