‘आता थोड्या दिवसांचाच खेळ’ शिंदे सरकारबद्दल आदित्य ठाकरेंचा मोठा दावा
हे घटनाबाह्य सरकार बसले थोड्या दिवसांचा खेळ आहे, हे सरकार कोसळणार म्हणजे, कोसळणारच आहे. या मंत्रिमंडळात महिला नाही, अस्सल मुंबईकर नाही. दुसरं कुणी दिसला आहे का? ना मुंबईचा आवाज आहे, ना पुण्याचा आवाज आहे. ना कोणत्या शेतकऱ्यांचं आवाज आहे, अशी टीका ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केली.
आजपासून राज्यात नवीन वाळू धोरण; पहिला डेपो या जिल्ह्यात
राज्यात आजपासून नवीन वाळू धोरण लागू करण्यात आलं असून सर्वांना केवळ 600 रूपये ब्रासने वाळू घरपोहच मिळणार आहे. वाळू तस्करीचा बिमोड करण्याबरोबरच गुंडगिरी मोडीत काढण्याचं काम या धोरणामुळे होणार आहे. महाराष्ट्रातील पहिल्या शासकीय वाळू डेपोचा शुभारंभ अहमदनगर जिल्ह्यात करण्यात आला आहे.महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून राज्यात आज महाराष्ट्र दिनी राज्यात नविन वाळू धोरणाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव येथे पहिल्या वाळू डेपोचे उद्घाटन महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय. नागरीकांना आता केवळ 600 रूपये ब्रासने घरपोहच वाळू मिळणार असून विखे पाटलांनी पहिल्या गाडीला हिरवा झेंडा दाखवत या योजनेची सुरूवात केली.
शिंदेंच्या शिलेदारानं गड राखला; पैठणमध्ये महाविकास आघाडीचा धुव्वा
छत्रपती संभाजीनगरमधून मोठी बातमी समोर येत आहे. शिंदे गटाचे मंत्री संदीपान भूमरे यांनी आपला गड राखला आहे. भुमरे यांच्या गटानं पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दणदणीत विजय मिळवत महाविकास आघाडीला धक्का दिला आहे. संदीपान भूमरे यांच्या गटाने पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीत आकरा पैकी आकरा जागांवर विजय मिळवला आहे. पैठणमध्ये महाविकास आघाडीला एकही जागा जिंकता आलेली नाहीये.
ठाकरेंच्या अडचणी वाढणार? पुण्यातील जम्बो कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी एकाला अटक
मागील वर्षी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यासह त्यांच्या मित्रपरिवारावर गंभीर आरोप केला होता. संजय राऊत मित्र परिवाराने 100 कोटींचा जम्बो कोविड सेंटर घोटाळा केला असल्याचा दावा सोमय्या यांनी केला होता. या प्रकरणात एकाला पोलिसांनी अटक केली आहे.
व्यावसायिक एलपीजीच्या दरांमध्ये मोठी कपात; सिलिंडर झाले १७१ रुपयांनी स्वस्त!
एकीकडे महागाई वाढत आहे तर दुसरीकडे मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी मोठा दिलासा मिळाला आहे. LPG सिलिंडरच्या दरात मोठी घसरण झाली आहे.देशातील 4 महानगरांमध्ये 171.50 रुपयांनी घसरण झाली आहे. नवे दर आजपासून लागू होणार आहे. तेल विपणन कंपनी इंडियन ऑइलच्या वेबसाइटवर नवीन किमतींची यादी जाहीर करण्यात आली आहे.
सोन्याचे धोतर, सोन्याचा चंदनहार अन् बरंच काही! जालन्यातील भाविकाने विठुरायाला अर्पण केले सव्वा कोटी रुपयांचे अलंकार
गोरगरिबांचा देव सावळ्या विठोबाच्या चरणी सव्वा कोटी रुपयांचे दागिने दान, नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर भाविकाने केले दुसऱ्यांदा कोट्यवधी रुपयांचे दान दिल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे.आज मोहिनी एकादशीच्या मुहूर्तावर विठोबाच्या चरणी पावणे दोन किलो वजनाचे सोन्याच्या धोतर, तसेच नाजूक बनावटीचा चंदन हार आणि सुंदर कलाकुसर असणारा कंठा असे सव्वा कोटी रुपये किमतीचे जालना मधील भाविकाने दान दिल आहे. सुंदर असणारे हे दागिने आज मंदिर समिती कडे सुपूर्त करण्यात आले. यानंतर सदर दागिने देवाच्या चरणी अर्पण केले. याच भाविकाने वसंत पंचमी दिवशी १ कोटी ८० लाख रुपयांचे दागिने देवाला आणि रुक्मिणी मातेला दान केले होते. विशेष म्हणजे या भाविकाने नाव गुप्त ठेवण्याची विनंती समितीला केली.
“…तर जिवाचीही पर्वा करणार नाही” म्हणत जंतरमंतरवरच्या कुस्तीगीरांना नवजोत सिद्धूंचा पाठिंबा
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात मागच्या नऊ दिवसांपासून महिला कुस्तीगीर हे दिल्लीतल्या जंतरमंतर या ठिकाणी आंदोलन करत आहेत. त्यांना पुरुष मल्लांची साथ लाभली आहे. बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचा ठपका या सगळ्यांनी ठेवला आहे. तसंच त्यांची हकालपट्टी करण्यात यावी अशीही मागणी या सगळ्यांनी केली आहे. या सगळ्या मल्लांना देशभरातून पाठिंबा मिळतो आहे. नुकतीच प्रियंका गांधींनी त्यांची भेट घेतली होती. त्यापाठोपाठ आज काँग्रेस नेते नवजोत सिंग सिद्धू यांनीही या कुस्तीगीर आंदोलकांची भेट घेतली.
दहशतवादी वापरत असलेल्या ‘या’ १४ मेसेंजर अॅप्सवर मोदी सरकारकडून बंदी
देशाच्या सुरक्षेच्या कारणास्तव केंद्र सरकारने १४ मोबाईल अॅप्स भारतात ब्लॉक केले आहेत. हे सर्व मेसेंजर अॅप्स आहेत. या अॅप्सचा वापर दहशतवादी कारवाया करण्यासाठी केला जात होता. पाकिस्तानमधून दहशतवाद्यांना संदेश पाठवण्यासाठी या अॅप्सचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात होता. मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानमधील दहशतवादी जम्मू काश्मीरमधील त्यांच्या सहकाऱ्यांना संदेश पाठवण्यासाठी हे १४ अॅप्स वापरत होते. देशातील अनेक तपास यंत्रणांच्या अहवालात याची पुष्टी झाली आहे.या १४ अॅप्समध्ये Crypviser, Enigma, Safeswiss, Wickrme, Mediafire, Briar, BChat, Nandbox, Conion, IMO, Element, Second line, Zangi आणि Threema चा समावेश आहे. आता सरकारने हे १४ अॅप्स भारतात बॅन केले आहेत.
‘मन की बात’द्वारे जनतेशी कायमचे नाते -मोदी; १०० वा भाग प्रसारित
‘‘ २०१४ मध्ये पंतप्रधानपदाची सूत्रे घेतल्यानंतर जाणवणारी रिक्तता आकाशवाणीवरील ‘मन की बात’ कार्यक्रमाद्वारे भरून काढली. जनतेशी आपले नाते कधीही तुटणार नाही, याची हमी आपल्याला मिळाली. ही भारतीयांच्या भावनांची अभिव्यक्ती होती आणि आपला अध्यात्मिक प्रवास होता,’’ अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी आकाशवाणीवरील त्यांचे मासिक संवाद सत्र ‘मन की बात’च्या शंभराव्या भागानिमित्त आपल्या भावना व्यक्त केल्या. यानिमित्त मोदींनी जुन्या स्मृतींना उजाळा दिला व ते भावूकही झाले.
SD Social Media
9850 60 3590