अन्य कोणत्याही प्राण्यांपेक्षा मनुष्याला प्रगत करणारा महत्त्वाचा घटक म्हणजे विज्ञान. जगभरातील अभ्यासक या वैज्ञानिक सिद्धांताच्या आधारावर सतत संशोधन करत असतात. या संशोधनाचा उपयोग मानवी जीवन अधिक समृद्ध, सोपं आणि निरोगी होण्यासाठी होतो. काल कल्पनाही केली नसेल किंवा अगदी अशक्य वाटणारी बाब आता विज्ञानाच्या आधारे प्रत्यक्ष घडली आहे. याचे अक्षरश: असंख्य उदाहरणं आहेत. नागपुरच्या बाजारपेठेत आता नव्या प्रकारचे फटाके दाखल झाले आहेत. त्यामुळे आपली दिवाळी पर्यावरणपूरक साजरी होणार आहे.
भारतातील सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी. देशभर दिवाळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यानिमित्ताने मोठ्या प्रमाणावर विविध फटाक्यांची आतिषबाजी केली जाते. मात्र, या फटाक्यांमुळे होणारा धूर आणि आवाजामुळे अनेक प्रदूषणाचा समस्या देखील उद्भवत असतात. यावर उपाय म्हणून पर्यावरण क्षेत्रात संशोधन करणाऱ्या राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था अर्थात निरीने पर्यावरण पूरक फटाके तयार केले आहेत.
निरीचे संशोधन
निरीने पर्यावरण पूरक फटाक्यांची निर्मिती केली आहे. यामध्ये पर्यावरणाला हानी पोहोचवणारे घटक वगळून प्रदूषण कमी करणारे फटाके विकसित केले आहे. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या फटाक्यांपेक्षा हे फटाके पर्यावरण पूरक आहे व त्याच्या किमती देखील वीस ते पन्नास टक्क्याहून कमी आहेत.CSIR NEERI ही पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असून पर्यावरण पूरक संशोधन करत असते. दिवाळी फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण लक्षात घेता डॉ.साधना रायलू यांच्या नेतृत्वात प्रदूषणाला आणि न पोहोचवता दिवाळी साजरी करता यावी यासाठी इको फ्रेंडली फटाके तयार करण्यात आले आहे.
पैशांची बचत
फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण अतिशय अल्प स्वरूपात असून पर्यावरणावर या फटाक्यांमुळे फार परिणाम होत नाही. शिवाय हे फटाके बाजारातील फटाक्यांपेक्षा माफक दरात उपलब्ध आहेत. या फटाक्यांच्या खरेदीमुळे जवळजवळ वीस ते पन्नास टक्के पैशांची बचत होणार आहे सोबतच पर्यावरणाचा समतोल देखील राखता येणार आहे.
कमी प्रदूषणाचे फटाके
हे फटाके तीन स्वरूपात विभागले आहेत. SWAS, SAFAL आणि STAR नावाच्या कमी प्रदूषण करणाऱ्या फटाकांचा समावेश आहे त्यांचा विकास आणि चाचणी यात केली जाते. ज्यामध्ये सेफ वॉटर रिलीजर (SWAS): पोटेशियम नायट्रेट आणि सल्फरचा वापर कमी करते.
सेफ मिनिमल अल्युमिनियम (SAFAL) अल्युमिनियमचा कमीत कमी वापर सुरक्षित थर्माइट क्रकर (STAR) : पोटशियम नायट्रेट आणि सल्फरचा वापर कमी करते आणि पार्टिक्युलेट मॅटर (PM) मध्ये 30 टक्क्यांपर्यंत कपात होते. पारंपारिक रसायनांच्या बदल्यात सीएसआयआरने विकसित केलेल्या सामग्रीचा वापर यामध्ये केला जातो, अशी माहिती सीएसआयआर निरी येथील प्रोजेक्ट असोसिएट पल्लवी इंगळे यांनी दिली.