लोक साखर झोपेत असताना मुंबईतल्या धारावीत झोपडपट्टीला भीषण आग, 25 घरे जळाली

मागच्या काही दिवसांपासून मुंबई आणि परिसरात आग लागण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. दरम्यान आज (दि.22) मुंबईतील शाहूनगर परिसरात भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. ही आग मुंबईचा शाहुनगर परिसरात असलेल्या कमला नगरचा झोपडपट्टीमध्ये लागली आहे. आग इतकी भीषण होती की आगीचे लोट बाहेर पडत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील शाहूनगर परिसरातील कमलानगर झोपडपट्टीत भीषण आग लागली आहे. या आगीमध्ये 25 पेक्षा जास्त घर जळून खाक झाली आहेत. घटनेची माहिती मिळतच अग्निशमन दलाचा दहापेक्षा जास्त गाड्या घटनास्थळावर दाखल होऊन आग विझवण्याचे प्रयत्न करत आहेत. दरम्यान नागरिक झोपेत असताना अचानक ही आग लागली. पहाटे चार वाजता ही आग लागल्याने नागरिकांचा एकच गोंधळ उडाला. सुदैवाने आतापर्यंत या आगीमध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नाही.

धारावीच्या शाहुनगर परिसरात पहाटे चारच्या सुमारास ही आग लागली. आग एवढी भीषण होती की, अग्निशमन दलाच्या 20 ते 25 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. धारावीतील शाहुनगरमधील कमला नगर म्हणजे, मोठा दाटीवाटीचा भाग. या झोपडपट्टी परिसरात अनेक लहान मोठी घरं अगदी दाटीवाटीनं एकमेकांना खेटून उभी आहेत.

याशिवाय या ठिकाणी अनेक लहान दुकानंही आहेत. ज्या परिसरात आग लागली, त्या परिसरात लेदरची अनेक दुकानं आहेत. तसेच, अनेक लहान-मोठे कपड्यांचे कारखानेही आहेत. त्यामुळे आग आणखी वाढत होती.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलासोबत शाहुनगर पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. या परिसरात लहान मोठी दुकानं, कारखान्यांसोबतच अनेक घरंही होती. पोलिसांनी तात्काळ नागरिकांना घरातून बाहेर काढून परिसर मोकळा केला. 

आग इतकी भीषण होती की, आजुबाजूच्या परिसरात धुराचे लोळ पसरले होते. धारावी शाहूनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धारावी कमला नगरची आग आटोक्यात आली आहे. सध्या फायर कूलिंगचं काम सुरू आहे. 50 ते 60 गारमेंटची दुकानं आणि घरं या आगीत जळून खाक झाली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.