तुर्कस्तान आणि सीरियामध्ये झालेल्या भूकंपामुळे हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला. तर 50 हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत. जखमींना आणि ढिगाऱ्याखाली दबलेल्यांना बाहेर काढण्यासाठी मदत आणि बचावकार्य सुरू आहे. या प्रचंड विध्वंसाच्या दरम्यान सर्वांची चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे, ज्यामुळे केवळ तुर्की आणि सीरियाच नाही तर संपूर्ण जग घाबरले आहे. तुर्कस्तानमध्ये झालेल्या शक्तिशाली भूकंपामुळे हा देश 10 फूट पुढे सरकल्याचे सांगण्यात येत आहे.
भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते, तुर्कीच्या खाली अनाटोलियन मायक्रोप्लेट्स आहेत. ते सतत एजियन मायक्रोप्लेट्सकडे जात आहेत. इतकेच नाही तर सरकणाऱ्या अॕनाटोलियन मायक्रोप्लेट्स अरेबियन टेक्टोनिक प्लेटला दाबत आहेत. त्याच वेळी, युरेशियन प्लेट वेगळ्या दिशेने फिरत आहे. अशाप्रकारे टेक्टोनिक प्लेट्सचे स्थलांतर तुर्कस्तानमध्ये तसेच त्याच्या शेजारी राष्ट्रांमध्ये प्रचंड विनाश घडवू शकते.
जर टेक्टोनिक प्लेट्स अशाच घसरत राहिल्या तर आपल्या पृथ्वीचा स्फोट होऊ शकतो, अशी भीती भूगर्भशास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. इटालियन भूकंपशास्त्रज्ञ डॉ. कार्लो डोग्लिओनी म्हणतात की तुर्की अनाटोलियन प्लेट, अरेबियन प्लेट आणि युरेशियन प्लेटशी जोडलेल्या आहेत. या प्लेट्समधील हालचालींमुळे भूकंपाचा धोकाही तुर्कस्तानमध्ये सर्वाधिक आहे.
तुर्कस्तानमध्ये झालेल्या भूकंपाची तीव्रता इतकी जास्त होती की टेक्टोनिक प्लेट्स सरकल्या आहेत. डरहम विद्यापीठातील स्ट्रक्चरल जिओलॉजीचे प्राध्यापक डॉ. बॉब होल्डवर्थ म्हणतात की 6.5 ते 6.9 तीव्रतेचा भूकंप झाला तर जमीन एक मीटरपर्यंत सरकते. यापेक्षा जास्त तीव्रतेच्या भूकंपांमुळे, जमीन आणखी हलू शकते.
भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते, अनाटोलियन मायक्रोप्लेट्स, एजियन मायक्रोप्लेट्स आणि युरेशियन प्लेट यांच्या एकाचवेळी हालचालींमुळे निर्माण झालेल्या प्रचंड शक्तीमुळे भूकंपानंतर कमी तीव्रतेचे भूकंप होत राहिले. ते म्हणतात की खालच्या प्लेटच्या सतत सरकण्यामुळे, आपली पृथ्वी दोन भागांमध्ये फुटू शकते.
9 फेब्रुवारी रोजी तुर्कस्तान आणि सीरियामध्ये झालेल्या भीषण भूकंपातील मृतांची संख्या 17,000 च्या वर गेली आहे. अधिकारी आणि डॉक्टरांच्या मते, 6 फेब्रुवारी 2023 रोजी झालेल्या 7.8 तीव्रतेच्या भूकंपामुळे तुर्कीमध्ये 12,873 आणि सीरियामध्ये 3,162 लोकांचा मृत्यू झाला. तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांनीही भूकंपामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या ठिकाणांना भेट दिली. यावेळी त्यांनी मदतकार्यातील अडचणी मान्य करताना निश्चितच उणिवा असल्याचे सांगितले.