दिवंगत काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. प्रज्ञा सातव यांनी स्वत: सोशल मीडियावरून त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती दिली आहे. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील कसबे धावंडा या गावात दौऱ्यावर असताना एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर पाठीमागून हल्ला केला. ही माहिती ही प्रज्ञा सातव यांनी ट्विटर आणि फेसबुकवर पोस्ट टाकून दिली आहे,त्यामुळे सध्या एकच खळबळ उडाली आहे.
माझे पती राजीव सातव नाहीत आणि माझी मुले लहान आहेत. मी कोणाचेही वाईट केले नाही. महिला आमदारावरील हल्ला हा लोकशाही वर हल्ला आहे. माझ्या जीवाला धोका असला तरी मी माझ्या लोकांसाठी काम करत राहीन, कारण राजीव भाऊंचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. इतिहासात सावित्रीबाई फुले, इंदिराजी यासारख्या थोर महिलांवर ही हल्ले झाले. मात्र त्यांनी घरी न बघता आपले चांगले काम सुरू ठेवले. हा माझ्यावर पूर्वनियोजित हल्ला होता. असं प्रज्ञा सातव त्यात फेसबुक पेजवर आणि ट्विटरवर लिहिले आहे.