कसबा आणि चिंचवडमध्ये तब्बल 73 उमेवार रिंगणात

भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे पुण्यातील कसबा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. तर आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे.

या दोन्ही जागांसाठी येत्या 26 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. सुरुवारीपासूनच या दोन्ही जागांवर बिनविरोध  निवडणूक व्हावी असा सुरू होता. मात्र या पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांसह अनेकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत कसबा मतदारसंघातून एकूण  33 उमेदवारांनी आपले अर्ज दाखले केले असून, चिंचवडच्या जागेसाठी 40 उमेदवार रिंगणार आहेत.

कसब्यात भाजप, काँग्रेसमध्ये लढत 

कसबा मतदारसंघात पोटनिवडणुकीची घोषणा झाल्यानंतर नाट्यमय घडामोडी घडल्याचं पहायला मिळालं. टिळक कुटुंब निवडणूक लढण्यासाठी इच्छूक असतानाही भाजपकडून टिळक वाड्याला डावलून हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली. कसबा मतदारसंघातून काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे. ही निवडणूक अटितटीची होणार असून, टिळक कुटुंबाच्या नाराजीचा फटका भाजपला बसू शकतो अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

चिंचवडमध्ये तिरंगी लढत  

तर दुसरीकडे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेलेल्या चिंचवड मतदारसंघात तिरंगी लढत पहायला मिळणार आहे. भाजप उमेदवार अश्विनी जगताप, राष्ट्रवादीचे उमेदवार विठ्ठल  काटे आणि शिवसेनेचे बंडखोर राहुल कलाटे यांच्यामध्ये ही लढत असेल. चिंचवडमध्ये तिरंगी लढत होणार असल्यानं या मतदारसंघात कोण बाजी मारणार याबाबत आता मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. चिंचवडमध्ये महाविकास आघाडीला बंडखोरीचा फटका बसण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.