पश्चिम बंगालमध्ये
भाजपाची दमछाक
सर्वाधिक चुरस पश्चिम बंगालमध्ये आहे. ममता बॅनर्जी यांची तृणमूल काँग्रेस सत्ता राखणार की भाजपला संधी मिळणार याची उत्सुकता आहे. सुरुवातीचे कल हाती आले असून यानुसार राज्यात तृणमूल काँग्रेसची लाट कायम असून पुन्हा ममता बॅनर्जी विजयाची हॅटट्रिक करण्याची शक्यता आहे. तृणमूल काँग्रेस स्पष्ट बहुमत मिळवत पुन्हा एकदा सत्तेत येण्याची शक्यता आहे. तर भाजपाची मात्र १०० च्या पुढेही जाताना दमछाक होण्याची शक्यता आहे.
पश्चिम बंगालमध्ये भाजपाला
सत्तेपासून जनतेने दूर ठेवलं
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची दोन तृतीयांश मतदानाकडे सध्या वाटचाल सुरू आहे अशा स्वरूपाचं चित्र आहे. पश्चिम बंगालची निवडणूक भाजपाने अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. पश्चिम बंगालच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा व भाजपाचे देशभरातील प्रमुख पदाधिकारी तिथे गेले होते. या ना त्या प्रकारे पश्चिम बंगालमध्ये आपली सत्ता स्थापन करावी यासाठी भाजपा मैदानात उतरली होती. परंतू पश्चिम बंगालच्या जनतेने पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. त्यांनी भाजपाला सत्तेपासून जनतेने दूर ठेवलं आहे,” असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.
आधुनिक नीरोचे
फिडल काढून घेतले
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी यासंदर्भात ट्वीट करून पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले आहे. “जनता होरपळत असताना पंतप्रधान जबाबदारी सोडून निवडणुकीत मग्न होते. जनतेने या आधुनिक नीरोचे फिडल काढून घेतले”, असं ट्वीट सचिन सावंत यांनी केलं आहे.
ममता बॅनर्जी यांच्यावर
ट्विटरवरुन शुभेच्छांचा वर्षाव
ममता बॅनर्जींच्या तृणमूलला स्पष्ट बहुमत मिळतानाचे चित्र दिसत आहे. असं असलं तरी भाजपानेही मागील विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा दमदार कामगिरी केल्याचं चित्र दिसत आहे. तृणमूल काँग्रेसने १९४ जागांवर आघाडी घेतली असून भाजपा मात्र १०० च्या आतच रोखली जाण्याची शक्यता आहे. भाजपा ९३ जागांवर आघाडीवर आहे. याच पार्श्वभूमीवर बंगालमध्ये आता तृणमूल सत्तेची हॅटट्रीक मारणार यावर केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे असं समजलं जात आहे. मतमोजणीचे आकडे समोर आल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर ट्विटरवरुन शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली जात आहे.
महामारीविरुद्ध लढा देण्याचं
काम एकजुटीने करू
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उत्स्फूर्त प्रतिक्रिया देत ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन केलं आहे. “जबरदस्त विजयाबद्दल ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन. चला आता लोकांच्या कल्याणासाठी आणि करोना महामारीविरुद्ध लढा देण्याचं काम एकजुटीने करू,” असं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे.
पंढरपूर मध्ये
भाजपाची आघाडी
पंढरपुरात सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झालीय. नियमांप्रमाणे आधी पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या मतदारसंघाचा आकार आणि एकूण मतदारांची संख्या पाहाता दुपारपर्यंत पंढरपूर पोटनिवडणुकीचा निकाल हाती येण्याची शक्यता आहे. भाजपाकडून समाधान अवताडे आणि महाविकासआघाडीकडून भगीरथ भालके यांच्यात इथे थेट सामना पाहायला मिळत आहे. भाजपाच्या समाधान आवताडे यांना २५ व्या फेरीअखेर भाजपाच्या अवताडे यांच्याकडे ६ हजार ३३४ मतांनी आघाडी आहे. सतराव्या फेरीपर्यंत अवताडेंना ७५ हजार ७३ मतं मिळाली तर भालकेंना एकूण ६८ हजार ७३९ मतं मिळाली आहे.
केवायसी 31 मेपर्यंत अपडेट करा
अन्यथा SBI चे खाते गोठवणार
देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक असलेल्या SBI ने आपल्या कोट्यवधी ग्राहकांना महत्त्वाची माहिती दिलीय. बँकेने एक अधिसूचना जारी केली असून, ग्राहकांना केवायसी अद्ययावत करण्यास सांगितलेय. जर तुम्ही एसबीआयचे ग्राहक असाल तर तुम्हाला हे काम 31 मेपर्यंत करावे लागणार आहे. केवायसी 31 मेपर्यंत करा, अन्यथा बँकिंग सेवा बंद होऊ शकेल, असंही बँकेने म्हटलेय. ग्राहकांना कोणताही त्रास होऊ न देता बँकिंग सेवा सुरू ठेवण्यासाठी 31 मे 2021 पर्यंत केवायसी अद्ययावत करणं आवश्यक आहे, असंही बँकेने स्पष्ट केलंय.
आगामी काळात ब्रिटनमध्ये कोरोना
लसीचं उत्पादन करण्याबाबत इशारा
सीरम इन्स्टिट्युटचे प्रमुख अदर पुनावाला यांनी भारतातील श्रीमंत आणि शक्तीशाली लोकांकडून धमक्या मिळत असल्याचं सांगितलंय. तसेच यामुळे आगामी काळात भारताबाहेर ब्रिटनमध्ये कोरोना लसीचं उत्पादन करण्याबाबत सूचक इशारा दिलाय. ते आंतरराष्ट्रीय मॅगेझिन टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. पुनावाला जगातील सर्वात मोठे कोरोना लस उत्पादक आहेत.
कर्णधारपदावरून
डेव्हिड वॉर्नरला हटवले
आयपीएलच्या 14 व्या पर्वात हैदराबादचा खराब फॉर्म सुरु आहे. त्यांचं कोणतंही प्लॅनिंग संघाला मिळवून देण्यात अपयशी ठरतंय. संघाला पहिल्या 6 सामन्यांपैकी 5 सामन्यांत पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. म्हणजेच हैदराबादने केवळ एक लढत जिंकली आहे. हैदराबाद गुणतालिकेत सध्या तळाशी आहे. अशातच हैदराबादने डेव्हिड वॉर्नरला कर्णधारपदावरून हटवून केन विल्यमसनकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय क्रिकेट फॅन्सना आवडलेला नाहीय. त्यांनी सोशल मीडियावरुन आपला संताप व्यक्त केलाय.
दिग्गज अभिनेते दिलीप कुमार
रुग्णालयात दाखल
दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिलीप कुमार यांच्या पत्नी-अभिनेत्री सायरा बानो यांनी दिलीप कुमार यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली. 98 वर्षीय दिलीप कुमार यांना रेग्युलर हेल्थ चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांच्या तब्येतीत सुधारणा असून रविवारी डिस्चार्ज मिळण्याची शक्यता सायरा बानो यांनी वर्तवली.
SD social media
9850 60 3590