‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ लवकरच होणार बंद? घसरत्या टीआरपीबाबत रिटा रिपोर्टरने दिलं उत्तर

छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय शोपैकी एक म्हणून ‘ तारक मेहता का उलटा चष्मा ‘ला ओळखलं जातं. हा विनोदी शो आपल्या हलक्या-फुलक्या विनोदाच्या जोरावर गेली 14वर्षे प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन करत आहे. लहान मुलांपासून ते वयोवृद्ध प्रेक्षकांपर्यंत सर्वच वयोगटातील लोक हा कार्यक्रम अत्यंत आवडीने पाहताना दिसून येतात. या मालिकेतील प्रत्येक पात्र घराघरात पोहोचलं आहे. दयाबेन, जेठालालपासून ते पोपटलालपर्यंत सर्वच कलाकार प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये शोमध्ये मोठा बदल झालेला दिसून येत आहे. मालिकेतील अनेक कलाकारांनी शोला रामराम ठोकला आहे. नुकतंच मालिकेचे दिग्दर्शक मालव राजदा यांनी हा शो सोडला आहे. दरम्यान आता ही मालिका बंद होणार का? अशी चर्चा सुरु आहे.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ चे दिग्दर्शक मालव राजदा यांनी तब्बल 14 वर्षानंतर मालिकेतून एक्झिट घेतली आहे. कलाकारांनंतर आता दिग्दर्शकानेच मालिकेला रामराम ठोकल्याने सर्वच चकित झाले आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर आता हा शो बंद होणार का? शोची टीआरपी घाली घसरणार का? अशी उलटसुलट चर्चा सुरु आहे. या सर्व बाबींवर अभिनेत्री आणि दिग्दर्शक मालव राजदा यांची पत्नी प्रिया अहुजाने स्पष्ट उत्तर देत आपलं मत मांडलं आहे. पाहूया प्रियाने नेमकं काय म्हटलंय.

प्रिया आहुजानेसुद्धा तारक मेहतामध्ये काम केलं आहे. यामध्ये अभिनेत्रीने रिटा रिपोर्टरची मजेशीर भूमिका साकारली होती. परंतु काही वर्षांपूर्वी प्रिया या मालिकेतून बाहेर पडली होती. दरम्यान तिचा पती आणि दिग्दर्शक मालव राजदाने हा शो सोडल्यानंतर ही मालिका बंद होणार का? किंवा शोचा टीआरपी मोठ्या प्रमाणात घसरणार का? यावर अभिनेत्रीने आपलं मत मांडलं आहे. अलीकडेच टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीत प्रियाने आपलं मत व्यक्त केलं आहे. या प्रश्नावर उत्तर देत प्रियाने असहमती दर्शवली आहे. प्रियाने म्हटलं मला नाही वाटत शोच्या टीआरपीमध्ये कोणताही बदल होईल’.

प्रिया पुढे म्हणाली, ‘शोच्या कॉलिटिमध्ये कोणताही बदल झालेला नाहीय. हा प्रत्येकाच्या बघण्याचा दृष्टिकोन आहे. त्यामुळे अनेकांना तसं वाटत असेल. मला हे टीआरपीचं गणित कधीच समजलं नाही. मला वाटत शो अधिप्रमाणेच चालत राहील. शो लवकरच बंद होईल असं मला अजिबात नाही वाटत’. असं म्हणत प्रिया अहुजाने या मालिकेच्या प्रेक्षकांना दिलासा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.