शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांचा सांगलीमध्ये अपघात झाला आहे. सायकल वरून जात असताना संभाजी भिडे चक्कर येऊन खाली पडले. त्यांच्या खुब्याला मार लागला आहे.
भारती हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार होणार आहेत. सांगलीतील गणपती मंदिरात दर्शनासाठी सायकल वरून संभाजी भिडे जात होते. चक्कर आल्यामुळे ते खाली पडले.
संभाजी भिडे यांना फॉलो करणारा मोठा वर्ग आहे. ज्यामध्ये तरुणांचं प्रमाण मोठं आहे. भिडे गुरुजी याआधी आपल्या वक्तव्यामुळे बऱ्याचदा चर्चेत आले आहेत.