बॉलिवूड अभिनेत्री हीना खान सध्या अत्यंत कठीण काळातून जात आहे. नुकतंच काही दिवसांपूर्वी तिच्या वडिलांचं निधन झालंय. त्यानंतर आता काही दिवसातच तिला कोरोनाची लागण झाली आहे. ही माहिती हीनानं स्वत: तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली होती. सोबतच आता तिचे सोशल मिडिया अकाऊंट्स तिची टीम हॅन्डल करणार असल्याचंही तिनं सांगितलं होतं. आता हिनानं तिचे काही फोटो शेअर करत एक भावनिक पोस्ट लिहिली आहे, ही पोस्ट वाचून तुम्हीही भावनिक व्हाल.
हीनानं तिचे 2 फोटो शेअर केले आहेत ज्यामध्ये ती मास्क परिधान करून खिडकीच्या बाहेर बघताना दिसतेय. हीनाच्या डोळ्यांत तिची उदासिनता आपल्याला दिसून येतेय, एक बॅक अॅन्ड व्हाईट आणि एक रंगीत फोटो तिनं शेअर केला आहे. फोटो शेअर करताना हीनाने लिहिलं की, ‘एक हतबल मुलगी जी आपल्या आईला गरज असतानाही तिच्या जवळ जाऊ शकत नाही, त्यांना सांभाळू शकत नाही. हा काळ फक्त आपल्यासाठीच नाही, तर प्रत्येकासाठी खूप कठीण आहे. ती पुढे म्हणाली मात्र की वाईट वेळ जास्त काळ टिकत नाही, खंबीर लोक जगतात… मी खंबीर आहे आणि नेहमीच डॅडीची स्ट्राँग मुलगी राहणार. आमच्यासाठी प्रार्थना करा.’ चाहत्यांसह सेलिब्रिटींनी हीनाच्या या पोस्टवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
नुकतंच हीनाने तिच्या इन्स्टाग्राम बायोमध्ये काही ओळी लिहत वडिलांना समर्पित केल्या होत्या. तिनं बायोमध्ये लिहिलं, ‘डॅडीज स्ट्रॉन्ग गर्ल.’ हीनाच्या पोस्टवरून हे स्पष्ट झालं आहे की तिचे वडील गेले असले तरी ती नेहमीच तिच्या वडिलांची स्ट्राँग मुलगी असेल.
वडिलांच्या निधनानंतर हीनाने एक पोस्ट शेअर केली होती, ‘या क्षणी माझ्या आणि माझ्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या कठीण काळी तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल आणि समर्थनाबद्दल तुमचे आभार. दरम्यान, माझं सोशल मीडिया अकाऊंट आता माझी टीम सांभाळणार आहे. धन्यवाद.’
हीनाची टीम आता तिच्या आगामी प्रकल्पांबद्दल पोस्ट करत आहे. नुकतंच हीनाचं ‘बेदर्द’ हे गाणं रिलीज झालं आहे, हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.