मुंबईचे निवृत्त एसीपी शमशेर पठाण यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. परमबीर सिंह यांच्यावर मुंबईवरील 26/11 हल्ल्यातील दहशतवादी कसाब याचा मोबाईल गायब केल्याचा आरोप आहे. निवृत्त ACP समशेर पठाण यांनी हा खळबळजनक आरोप केला आहे.
समशेर पठाण यांनी यासंदर्भात त्यांनी यावर्षी 26 जुलैला मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले आहे. त्यात परमबीर सिंह यांनी दहशतवादी कसाबचा मोबाईल गायब करण्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी समशेर पठाण यांनी परमबीर सिंह यांची चौकशी आणि कारवाईची मागणी केली आहे.
याबाबत पठाण यांनी जुलै महिन्यात राज्याचे गृहमंत्री आणि मुंबई पोलीस आयुक्त यांना हे पत्र लिहिलं होते. 26/11 मधील दहशतवाद्यांना परमबीर सिंह यानी मदत केल्याचा आरोप पठाण यांनी केला आहे. पठाण यांने आपल्या तक्रारीत असेही म्हटले आहे की, परमबीर सिंह यांनी दहशतवादी अजमल कसाब याचा मोबाइल त्यावेळी स्वत:कडे ठेवून घेतला होता. या 26/11च्या हल्यावेळी परमबीर सिंह हे एटीएसमध्ये कार्यरत होते. आज तागायत तो कसाबचा मोबाईल तपास यंत्रणेच्या हाती लागला नसल्याचे आरोप पठाण यांनी केला आहे.
या प्रकरणाचा तपास मुंबई क्राईम ब्रँचकडे वर्ग करण्यात आला होता, त्यानंतरही त्यांनी तो मोबाईल क्राइम ब्रँचकडे सोपवला गेला नाही. या प्रकरणाचीही चौकशी करण्याची विनंती पठाण यांनी केली आहे.