पाईप मधून निघाल्या चक्क नोटा, कर्नाटकातील प्रकार

Choked सिनेमाची आठवण करून देणारी एक घटना महाराष्ट्राशेजारी घडली आहे. तुम्ही जर रेड किंवा Choked सिनेमा पाहिला असेल तर तुम्हाला हा त्यातले सीन डोळ्यासमोरून जातील. पाईपमधून पाणी येण्याऐवजी हजार नाही लाखो रुपयांच्या नोटा बाहेर आल्या आहेत.

कर्नाटकातील कलबुर्गीत अॅन्टी करप्शन ब्यूरोनं टाकलेल्या धाडीत धक्कादायक घटना समोर आलीय आहे. PWD विभागात कनिष्ठ अभियंता पदावर कार्यरत असणा-या एस एम बिरादर याच्या घरावर छापे टाकण्यात आले.

या छपेमारी दरम्यान घराबाहेरील प्लास्टिक पाईप्समध्ये पैसे लपवण्यात आल्याची माहिती मिळाली होती. तपासा दरम्यान ACB च्या अधिकाऱ्यांनी पाईपमधून पैसे बाहेर काढले.

पाईप कापून ACB अधिका-यांनी पैसे बाहेर काढले. तर बिरादर याच्या घरातूनही मोठ्या प्रमाणात पैसे आणि दागिने जप्त करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. रेड सिनेमात ज्या पद्धतीनं अजय देवगण लपवलेली संपत्ती आणि पैसा शोधून काढतो अगदी तशाच पद्धतीने ACB ने कारवाई केल्याचं हा व्हिडीओ पाहून चित्र डोळ्यासमोर येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.