विद्यार्थ्यांचे अच्छे दिन ! आता शिक्षणासाठी परदेशात जाण्याची गरजच नाही ; परदेशी विद्यापीठं येणार भारतात
भारतातले विद्यार्थी आता देशाबाहेर न जाता सर्वोत्तम परदेशी विद्यापीठांमध्ये शिक्षण घेऊ शकतील. कारण, आता परदेशी विद्यापीठांना देशभरात त्यांचे कॅम्पस सुरू करण्याची परवानगी दिली जाणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) 2020 अंतर्गत, उच्च शिक्षणाचं ‘आंतरराष्ट्रीयीकरण’ हा घटक प्रमुख धोरणात्मक उपक्रमांपैकी एक आहे. यासंबंधीच्या मार्गदर्शक तत्त्वांचा मसुदा गुरुवारी (5 जानेवारी 2023) प्रसिद्ध करण्यात आला.
विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच यूजीसीद्वारे (भारतात परदेशी उच्च शैक्षणिक संस्थांच्या कॅम्पसची स्थापना आणि संचालन) मार्गदर्शक तत्त्वं, 2023 जारी करण्यात आली आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये विद्यापीठांना त्यांची स्वतःची प्रवेश प्रक्रिया आणि फी ठरवण्याच्या बाबतीत अधिक स्वायत्तता दिली आहे. भारतीय आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही गटांतले विद्यार्थी परदेशी विद्यापीठांच्या कॅम्पसमध्ये प्रवेश घेऊ शकतात.
तिसऱ्या टी २० सामन्यात भारतीय संघ पडणार श्रीलंकेवर भारी? असा आहे सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवरील भारताचा रेकॉर्ड
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात सुरु असलेल्या टी 20 मालिकेत उद्या निर्णायक सामना पारपडणार आहे. भारताने श्रीलंकाविरुद्ध मालिकेतील पहिला सामना जिंकून मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. तर गुरुवारी मालिकेतील दुसरा सामना जिंकून श्रीलंकेने मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. आता सर्वांचे लक्ष उद्या होणाऱ्या टी 20 मालिकेतील तिसऱ्या सामन्याकडे लागले असून उद्याच्या सामन्यात कोण बाजी मारणार याबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे.श्रीलंका विरुद्धचा तिसरा टी 20 सामना हा उद्या शनिवारी राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडिअमवर पार पडणार आहे. या स्टेडियमवर भारतीय संघाचा विजयाचा रेकॉर्ड असल्याने या सामन्यात भारत श्रीलंकेवर भारी पडणार असे बोलले जात आहे. भारताने आतापर्यंत या स्टेडिअमवर 4 टी20 सामने खेळले आहेत. तर यापैकी ३ सामने भारताने जिंकले असून केवळ एका सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला होता.
पेलेंनंतर आठवड्याभरात आणखी एका फुटबॉलपटूचे निधन, कर्करोगाशी झुंज अपयशी
ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांच्या निधनानंतर आठवड्याभरातच फुटबॉल विश्वातून आणखी एक दु:खद बातमी समोर आली आहे. इटलीचे माजी फुटबॉल प्लेअर जियानलुका वियाली यांचं वयाच्या ५८ व्या वर्षी निधन झालं आहे. जियानलुका वियाली यांना २०१७ मध्ये कर्करोगाचे निदान झाले होते. कर्करोगाशी त्यांची झुंज अपयशी ठरली. फुटबॉल कारकिर्दीत त्यांनी अनेक विक्रम नोंदवले होते.
इटलीच्या फुटबॉल महासंघाने शुक्रवारी जियानलुका यांच्या निधनाची माहिती दिली. जियानलुका यांच्या निधानंतर सोशल मीडियावर फुटबॉलच्या चाहत्यांनी शोक व्यक्त केला आहे. आंतरराष्ट्रीय फुटबॉल कारकिर्दीत इटलीच्या नॅशनल टीमकडून जियानलुका यांनी ५९ सामने खेळले होते.
दिल्लीत MCD बैठकीत आप-भाजपमध्ये राडा
निवडणुकीनंतर दिल्ली महापालिकेच्या पहिल्याच सभेत आप आणि भाजप नगरसेवकांमध्ये जोरदार राडा पाहायला मिळाला. उपराज्यपाल व्हीके सक्सेना यांनी नियुक्त केलेल्या 10 ‘एल्डरमेन’ (नामनिर्देशित नगरसेवक) च्या पहिल्या शपथविधीबद्दल आम आदमी पक्षाच्या नगरसेवकांनी आक्षेप नोंदवला. यावरुन भाजप आणि आपचे नगरसेवक आपापसात भिडले. परिणामी नवनिर्वाचित नगरसेवकांची पहिली बैठक निवडणुकीशिवाय स्थगित झाली. महापौर आणि उपमहापौर निवडणुकीसाठी नियुक्त केलेले पीठासीन अधिकारी भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नगरसेवक सत्य शर्मा म्हणाले, “एमसीडी सभागृहाची बैठक दिवसभरासाठी तहकूब करण्यात आली आहे. पुढील तारीख नंतर जाहीर केली जाईल.
काश्मीर खोऱ्यात ‘भारत जोडो’ यात्रा यशस्वी होणे केंद्र सरकारसाठीही लाभदायी
‘भारत जोडो’ यात्रेच्या अंतिम टप्प्यासाठी, जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेसने पूर्वतयारी केली असून सुरक्षेच्या दृष्टीने तिथल्या प्रशासनाशीही संवाद साधण्यात आला आहे. काश्मीर खोऱ्यात ही यात्रा यशस्वी होणे काँग्रेससाठी महत्त्वाचे असले तरी, येथील यात्रेचा प्रवास निर्विघ्न होणे केंद्र सरकार व भाजपसाठी देखील राजकीय लाभाचे असल्याचे मानले जात आहे.
जगभराची चिंता पुन्हा वाढवणाऱ्या चीनचा मोठा दावा
मागील काही दिवसांपासून चीनमध्ये करोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. करोनाग्रस्तांची वाढ झाल्यामुळे येथे रुग्णालये अपुरी पडत असल्याचा दावा केला जात आहे. तसेच रुग्णसंख्या वाढत असताना चीनकडून तेथील करोनास्थितीबाबत माहिती दिली जात नाहीये, असा आरोप केला जात आहे. असे असतानाच चीनने आमच्याकडील करोनास्थिती नियंत्रणात आहे, असे सांगितले आहे. तसेच चीनने तेथील करोनास्थिती स्पष्ट करणारी आकडेवारीदेखील जागतिक आरोग्य संघटनेकडे दिली आहे.
नाद करायचा नाय! भारताशी पंगा घेणं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला पडले महागात
आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष जय शाह यांनी गुरुवारी (५ जानेवारी) आशिया चषक आणि पुढील दोन वर्षांचे (२०२३-२४) वेळापत्रक जाहीर केले. याचे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (पीसीबी) खूप वाईट वाटले. पीसीबीचे अध्यक्ष नजम सेठी यांनी जय शाह यांच्या ट्विटला उत्तर देताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली होती. जय शाह यांनी कोणताही सल्लामसलत किंवा वाटाघाटी न करता एकतर्फी निर्णय घेऊन हे वेळापत्रक जारी केल्याचा आरोप नजम सेठी यांनी केला आहे. आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद आपल्याकडेच आहे याचे सर्वाधिक वाईट पाकिस्तानी बोर्डाला वाटले आहे आणि त्या स्पर्धेबाबत पीसीबीशीही बोलले गेले नाही.
SD Social Media
9850 60 3590