पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचं निधन झालं आहे. त्या 100 शंभर वर्षांच्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईची तब्येत बिघडली होती, त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी अहमदाबादच्या यूएन मेहता रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान, त्यांची प्राणज्योत मालवली. प्राथमिक माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांना 18 जून रोजी 100 वर्षात पदार्पण केलं होतं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत 18 जून रोजी आपला 100 वा वाढदिवस साजरा केला. गुजरात निवडणुकीआधी मार्च 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये आपल्या घरी जाऊन आईचे आशीर्वाद घेतले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईचा जन्म 18 जून 1923 रोजी गांधीनगर इथे झाला. गांधीनगर शहराच्या सीमेवरील रेसन गावात हिराबेन पंतप्रधानांचे धाकटे बंधू पंकज मोदी यांच्यासोबत राहतात.
पंतप्रधान झाल्यानंतर कोणत्याही सुरक्षेशिवाय नरेंद्र मोदी आईला भेटण्यासाठी गांधीनगरला 17 सप्टेंबर 2014 रोजी घरी पोहोचले होते. यावेळी त्यांनी आईसोबत काही खास क्षण घालवले होते. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.