हा आहे नवा बिझनेस! 10 हजारात करा सुरुवात, कमी भांडवलात भरपूर नफा! 

ख्रिसमस, नवीन वर्ष, वाढदिवस असे क्षण साजरे करणं हा सध्याचा ट्रेंड आहे. आयुष्यातले हे छोटे मोठे क्षण साजरे करताना गिफ्ट तर द्यायलाच हवं. त्यासाठी गिफ्ट बास्केट हा सध्याचा सगळ्यात लोकप्रिय पर्याय आहे. येत्या नव्या वर्षात एखादा बिझनेस करायचं ठरवत असाल, तर गिप्ट बास्केटचा बिझनेस उत्तम पर्याय ठरेल. त्यासाठी खूप भांडवलही लागत नाही व घरच्या घरी उत्तम प्रकारे सुरुवात करता येते.

छोट्या भांडवली गुंतवणुकीवर स्टार्टअप सुरु करण्याचा सध्याचा काळ आहे. बिझनेसच्या नव्या संधी त्यामुळे निर्माण झाल्यात. गिफ्ट बास्केट ही त्यापैकीच एक भन्नाट कल्पना आहे. एखाद्या कार्यक्रमासाठी गिफ्ट देताना गिफ्ट बास्केट देण्याकडे हल्ली लोकांचा कल वाढतोय. ऑनलाईन किंवा दुकानांमधूनही अशाच पद्धतीच्या भेटवस्तू लोक निवडतात. भारतासारख्या उत्सवप्रिय देशामध्ये सणावारांची कमतरता नाही. त्यामुळे गिफ्ट बास्केटचा बिझनेस करुन चांगली कमाई करता येऊ शकते.

काय असते गिफ्ट बास्केट?

मिठाई, चॉकलेट्स, कार्ड्स अशा वेगवेगळ्या गोष्टी एका बास्केटमध्ये ठेवून त्याची छान सजावट केलेली असते. रिबिन्स, खोटी फुलं, रंगीत कागद असं साहित्य वापरून ती बास्केट सजवलेली असते.

काय साहित्य लागतं?

गिफ्ट बास्केट तयार करण्यासाठी विविध आकाराच्या बास्केट, रॅपिंग पेपर, बास्केट सजवण्यासाठीचं सामान, बास्केट पॅक करण्यासाठीचं साहित्य, कात्री, पातळ तार, वायर कटर, पेपर श्रेडर, कार्ठन स्टेपलर, डिझायनर रंगीत कापड, स्टीकर तसंच क्राफ्ट साहित्य यांचा वापर करून ही बास्केट तयार करता येते.

घरगुती स्वरुपात 10 हजार रुपयांची गुंतवणूक करून हा व्यवसाय सुरु करता येतो. यासाठी तुमच्याकडे कलाकाराची दृष्टी असायला हवी. कलेची जाण असेल, तर वेगवेगळ्या आकाराच्या बास्केट तयार करून सजवून त्या दुकानांमध्ये किंवा ई कॉमर्सच्या वेबसाईट्सवर विक्रीसाठी ठेवता येऊ शकतात. बास्केट बनवण्याचं साहित्य घाऊक बाजारातून कमी किमतीत विकत घेऊन त्यातून या व्यवसायात चांगला नफा कमावता येऊ शकतो.

सध्या सेलिब्रेशनची क्रेझ आहे. त्यामुळे गिफ्ट्सची मागणीही वाढलीय. त्यासाठी गिफ्ट बास्केट देण्याकडे हल्ली अनेकांचा कल आहे. ही गिफ्ट बास्केट 100 रुपयांपासून सुरु होऊन 1000 रुपये किमतीची असतात. प्रत्येक बास्केटवर 50 टक्क्यांपर्यंत नफा मिळवता येऊ शकतो. अर्थात कोणताही व्यवसाय सुरु करताना त्यात मार्केटिंग अत्यंत महत्त्वाचं असतं. सुरुवातीला तुमची गिफ्ट बास्केट दुकानांमध्ये विक्रीसाठी ठेवू शकता. त्यानंतर ऑनलाईन विक्रीसाठी ईकॉमर्स वेबसाईटवर देऊ शकता. मात्र त्यासाठी तुमची बास्केट इतरांपेक्षा वेगळी कशी असेल, यावर काम केलं पाहिजे. नव्या वर्षात व्यवसायाची ही नवी संधी घ्यायला काहीच हरकत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.